ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोनामुळे 'या' क्षेत्रातील २ लाखांहून अधिकजणांच्या नोकऱ्या धोक्यात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 06, 2020 11:24 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोनामुळे 'या' क्षेत्रातील २ लाखांहून अधिकजणांच्या नोकऱ्या धोक्यात

शहर : मुंबई

कोरोना व्हायरसचा धोका वाढत असतानाच अनेक विभागांवर याचे थेट परिणाम पाहायला मिळत आहेत. नोकऱ्यांपासून दैनंदिन जीवनापर्यंत याचे परिणाम आता दिसून येऊ लागले आहेत. याच परिस्थितीमध्ये काही क्षेत्रांतील नोकऱ्यांना या परिस्थितीचा सर्वाधिक धोका असल्याची बाब समोर आली आहे.

विमानसेवा आणि हॉस्पिटॅलिटी अशा क्षेत्रांवना कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा सर्वाधिक फटका बसला आहे. ज्यामुळे देशातील खासगी विमानतळांवर काम करणाऱ्या संचालकांसह जवळपास २ लाखांहून अधिकजणांच्या नोकरीचा मोठा प्रश्न आता उभा राहिला आहे.

असोसिएशन ऑफ प्राइवेट एयरपोर्ट ऑपरेर्ट्स(APAO) कडून केंद्र सरकारलाही या प्रकरणाची दखल घेण्यासंबंधीची विनंती करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत फक्त आर्थिक तरतुदच नव्हे, तर या क्षेत्राचं काम सुरु राहण्यासाठीसुद्धा काही तरतुदी निर्माण करण्याबाबत सांगण्यात येत आहे.

सध्याच्या घडीला विमानतळांवर कार्यरत असणाऱ्या २ लाख ४० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या अडचणीत आहेत. ज्यामध्ये काही संचालकांचाही समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, नोकरदार वर्गाच्या कपातीचा सामनाही येत्या काळात नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद येथील काही खासगी विमानतळ व्यवस्थापकांना आणि तेथील कर्मचाऱ्यांना करावा लागणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या लॉकडाऊनची शेवटची तारीख ही १४ एप्रिलपर्यंत आहे. या काळात कोणत्याही प्रकारचं आंतरदेशीय किंवा आंतरराष्ट्रीय उड्डाण केलं जात नाही आहे. फक्त आणि फक्त कार्गो संचालनालाच यात मुभा देण्यात आली आहे. ज्यामुळे विमान कंपन्याचं मोठ्या प्रमाणआत नुकसान होत आहे. तेव्हा आता खासगी विमानतळांवरील या कर्मचारी वर्गासाठी येत्या काळात कोणते उपाय योजले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

मागे

कोरोना : वाढदिवसाला भाजप आमदाराकडून धान्याचं वाटप, गुन्हा दाखल
कोरोना : वाढदिवसाला भाजप आमदाराकडून धान्याचं वाटप, गुन्हा दाखल

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आलेत. सतत नागरिकांना घरात र....

अधिक वाचा

पुढे  

अवघ्या १२ तासांत कोरोनाचे ४९० नवे रुग्ण; सरकारचा मोठा निर्णय
अवघ्या १२ तासांत कोरोनाचे ४९० नवे रुग्ण; सरकारचा मोठा निर्णय

देशभरात गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाचे ४९० रुग्ण आढल्यामुळे भारतातील एकूण ....

Read more