By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑक्टोबर 03, 2020 08:21 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
देशात कोरोना बळींची संख्या 1 लाखांच्या पार गेली आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढता आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 81 हजार 484 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे 1095 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या 63 लाखांहून अधिक झाली आहे. तर कोरोनामुळे मृतांचा 1 लाखांच्या पुढे पोहचला आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्येत भारत सध्या जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे कोरोनाचा मृत्यूदर जरी देशात कमी असला तरी दररोज सरासरी हजाराच्या आसपास रुग्णांचा कोरोनाने मृत्यू होत आहे.
नवीन कोरोना संक्रमित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त
कोरोना साथीच्या आजाराने संक्रमित देशांमध्ये भारत दुसर्या क्रमांकावर आहे. तर कोविड 19 मुळे झालेल्या मृत्यूंच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अशात एक दिलासा देणारी बातमी आली आहे. भारतात कोरोना रुग्णांचा रिकवरी रेट दिवसेंदिवस वाढत आहे. नवीन संक्रमित रूग्णांच्या तुलनेत बरे होणार्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत आहे.
भारतात संसर्गातून रिकवर होण्याची वेग वाढत आहे.
6 जुलै रोजी रिकवरी रेट 60.85% होता.
1 ऑगस्ट रोजी रिकवरी रेट 64.52% होता.
20 ऑगस्ट रोजी रिकवरी रेट 73.90% होता.
1 सप्टेंबर रोजी रिकवरी रेट 76.93% होता.
11 सप्टेंबर रोजी रिकवरी रेट 77.65% होता.
20 सप्टेंबर रोजी रिकवरी रेट 79.68% होता.
27 सप्टेंबर रोजी हा दर वाढून 82.46% झाला.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशासह राज्यातही लॉकडाऊन लागू करण्य....
अधिक वाचा