By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 16, 2021 01:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यात आता कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर होत चालली आहे. (Coronavirus in Maharashtra) एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. याचे मोठे उदाहरण मुंबईसह पुणे शहरात पाहायला मिळत आहे. (Coronavirus in Pune) या मोठ्या दोन शहरात कोरोना बाधित रुग्णांना बेडच मिळत नसल्याचे दिसून येत आहे. पुण्यात जिल्हा शासयकीय रुग्णालयात भयावह स्थिती पाहायला मिळत आहे. एकाच बेडवर दोन ते तीन रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. तसेच बेड नसल्याने खाली झोपून उपचार करण्यात येत आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, ससून रुग्णालयात तीन दिवसांपासून रेमडेसिवीरचे इंजेक्शन मिळत नसल्याने संताप काल दिसून आला आहे. पुण्यात रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा जाणवत आहे. (Shortage of Remedicator in Pune) त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रेमडेसिवीर औषध मिळत नाही म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांचा ठिय्या आंदोलन सुरु केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रुग्णांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. दरम्यान, संचारबंदी असतांना नातेवाईक मोठ्या प्रमाणात जमले होते.
पुण्यात रेमडेसिवीरचा तुटवडा कायम आहे. विभागात रेमडेसिवीरचा 90टक्के तुटवडा आहे. त्यामुळे कुठल्याही डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांनारेमडेसिवीरबाबत प्रिस्क्रिप्शन देऊ नये असा आदेश देण्यात आले आहेत. तसेच हॉस्पिटलने केमिस्ट कडूनच रेमडेसिवीर घ्यावं, असे आवाहन करण्यात आले आहे. दिवसाला देशात 70 हजार रेमडेसिवीर तयार होते. त्याचा सर्वाधिक साठा महाराष्ट्रात येत आहे. मात्र तीन दिवसांपासून पुरवठा कमी झाला आहे. एका बॅचच्या उत्पादन प्रक्रियेसाठी 20 दिवस लागतात. पुण्यात दिवसाला 18 हजार इंजेक्शनची गरज आहे, अशी माहिती अन्न औषध प्रशासन पुणे विभागाचे सहाय्यक आयुक्त एस व्ही प्रतापवार यांनी दिली आहे.
कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही 3 लाखांच्या पुढे गेली आहे. आता तर ससून रुग्णालयात एकाच बेडवर तीन - तीन रुग्ण असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. जागा नसल्याने खाली झोपून उपचार सुरु आहेत. पुण्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याचे दिसत आहे. ससून हॉस्पिटलमधील व्हिडिओ समोर आल्याने आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः तीनतेरा वाजल्याचे दिसत आहे.
रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने उपचारासाठी पुरेशी जागा नाही. एकाच बेडवर दोन किंवा तीन रुग्ण उपचार घेत असल्याचे चित्र आहे. रुग्ण वाढीबरोबरच मृत्यूचा आकडाही वाढू लागला. मात्र मनुष्यबळ आणि इतर साधनाअभावी ससूनची नवीन इमारत बांधून असतांनाही त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती ओढवल्याची ओरड आता होऊ लागली आहे.
देशात एकीकडे अच्छे दिन कधी येणार याची अतुरतेने सर्वसमान्य जनता प्रतीक्षा क....
अधिक वाचा