By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 29, 2020 07:34 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोना व्हायरसने जगभरात कहर केलाय. सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांमध्ये आता रेल्वेकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. रेल्वेकडून नॉन-एसी डब्ब्यांचं आयसोलेशन वॉर्डमध्ये रुपांतर करण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे.
ट्रेनमध्ये कोरोना संसर्गाच्या संशयित रुग्णांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या डब्ब्यांमध्ये क्वारंटाईन असलेल्या लोकांसाठीऔषधं आणि जेवणाची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
रेल्वेकडून करण्यात येत असलेल्या या प्रयत्नांना हिरवा कंदिल मिळाल्यास, रेल्वे 10-10 डब्ब्यांचं आयसोलेशन वॉर्डमध्ये रुपांतर करण्यास सुरुवात करणार आहे. यामुळे विविध भागात राहणाऱ्या कोरोना व्हायरस रुग्णांच्या उपचारासाठी मदत होणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट शेअर केलं होतं. एका यूजरकडून इन्स्टाग्रामवर कोरोनाबाबत आलेला सल्ला त्यांनी शेअर केला होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे गरीब आणि मजूरांस....
अधिक वाचा