ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जिल्ह्यातील देशी-विदेशी दारू विक्रीसह बार, वाइन शॉप 31 मार्च पर्यंत बंद

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 20, 2020 06:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जिल्ह्यातील देशी-विदेशी दारू विक्रीसह बार, वाइन शॉप 31 मार्च पर्यंत बंद

शहर : औरंगाबाद

कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी लोकांची गर्दी कमी करण्याच्या हेतूने जिल्ह्यात तात्पुरती दारू बंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या या आदेशानुसार, 20 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून 31 मार्च पर्यंत ही बंदी लावली जात आहे. यामध्ये देशी, विदेशी दारुची विक्री, बिअर बार आणि वाइन शॉपवर बंदी लावण्यात येत आहे. औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या या पत्रकात आदेशाची अंमलबजावणी नाही करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. धुळ्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी सुद्धा अशाच स्वरुपाचे आदेश जारी केले आहेत.

जग आणि देशासह महाराष्ट्रात सुद्धा कोरोनामुळे गर्दी कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यातही महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त असून औरंगाबादमध्ये एक कोरोना रुग्ण सापडला आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी कमी करण्याच्या हेतूने जिल्हाधिकाऱ्यांनी उपाय-योजना केल्या आहेत. औरंगाबादमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या उपाययोजना आवश्यक आहेत. त्यामध्येच दारु विक्री होत असताना बिअर बार आणि वाइन शॉपवर प्रचंड गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. हीच गर्दी लक्षात घेता, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि मुंबई मद्य निषेध कायदा कलम 142 (1) अन्वये संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातील देशी, विदेशी मद्य विक्री, किरकोळ मद्यविक्री, बिअर बार आणि वाइन शॉप दिनांक 20 मार्च 2020 पासून 31 मार्च 2020 पर्यंत पूर्ण दिवस बंद ठेवले जाणार आहेत. व्यक्ती-व्यक्तींमध्ये होणारा संपर्क टाळण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

धुळ्यात ऑनलाइन डिलिव्हरीवर सुद्धा बंदी

धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केवळ बिअर बार आणि वाइन शॉपच नव्हे, तर लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, सामूहिक कार्यक्रम सोहळे, ऑनलाइन वस्तू आणि खाद्य पदार्थांची डिलिव्हरी या सर्वांवर बंदी लावली आहे. अनावश्यक गर्दी केल्यास कारवाई करण्यात येईल. सोबतच, यापूर्वीच सार्वजनिक कार्यक्रमांची परवानगी मिळाली असल्यास ती आता 20 मार्च ते 31 मार्चच्या कालखंडात रद्द केली जाईल असेही आदेशात सांगण्यात आले आहे.

 

मागे

कुत्र्यांनाही कोरोनाची लागण, एकाचा मृत्यू
कुत्र्यांनाही कोरोनाची लागण, एकाचा मृत्यू

जगभरात हैराण करुन सोडणार्‍या कोरोना विषाणूचा प्रभाव प्राण्यांवरही बघायल....

अधिक वाचा

पुढे  

निर्भया दोषींना फाशी : अण्णा हजारे यांचे मौनव्रत आंदोलन मागे
निर्भया दोषींना फाशी : अण्णा हजारे यांचे मौनव्रत आंदोलन मागे

दिल्लीतील निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अ....

Read more