By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 12, 2020 01:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
देशभरात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांची संख्या ९०९ ने वाढली आहे. तर ३४ लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे देशातील लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवला जाण्याची दाट शक्यता आहे.केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या माहितीनुसार देशातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा आता ८,३५६ इतका झाला आहे. तर एकूण २७३ लोकांचा आतापर्यंत बळी गेला आहे. कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी आगामी काळात कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या परिसरात रॅपिड टेस्ट करण्याचा सरकारचा इरादा आहे. मात्र, या टेस्टसाठी लागणारी किटस् अजूनपर्यंत उपलब्ध होऊ शकलेली नाहीत. आतापर्यंत केंद्र सरकारला अडीच लाख लाख किटस् मिळणे अपेक्षित होते. मात्र, त्यासाठी आणखी दोन ते तीन दिवसांचा अवधी लागू शकतो.
शहरातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावी....
अधिक वाचा