ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हिंदुजा रुग्णालयात कोरोनाचा रुग्ण; डॉक्टर, कर्मचाऱ्यांची तपासणी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 13, 2020 11:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30

हिंदुजा रुग्णालयात कोरोनाचा रुग्ण; डॉक्टर, कर्मचाऱ्यांची तपासणी

शहर : मुंबई

संपूर्ण जगात दहशत पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसचा आणखी एक रुग्ण मुंबईत सापडला आहे. मुंबईच्या सुप्रसिद्ध हिंदुजा रुग्णालयातील व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या रुग्णाच्या संपर्कात असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हिंदुजा रुग्णालयातील १०० कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आज दुपारपर्यंत या सर्वांचे रिपोर्ट येणार असल्याचे कळते. हे रिपोर्ट येईपर्यंत संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना हिंदुजा रुग्णालयातील स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. तर कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाला कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दरम्यान, काल दिवसभरात कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाचे १८ संशयित रुग्ण दाखल झाले. या सर्वांचे अहवालही आजच मिळणार आहेत. महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांची संख्या ११ झाली असून या सर्व रुग्णांमध्ये लक्षणे कमी प्रमाणात जाणवत आहेत. त्यामुळे काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.

करोनाने आतापर्यंत जगभरात ४६०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १,२५,२९३ जणांना करोनाची लागण झाली आहे. भारतात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी आणखी खबरदारीची पावले उचलली आहेत. दिल्ली सरकारने ३१ मार्चपर्यंत सर्व शाळा, कॉलेजेस, चित्रपटगृह बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 

मागे

अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार - अजित पवार
अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार - अजित पवार

काम न करता, शासकीय तिजोरीतून निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल ....

अधिक वाचा

पुढे  

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे तीन रुग्ण
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे तीन रुग्ण

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहरातील पाच संशयित कोरोना रुग्णांपैकी तीन ....

Read more