ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सांगलीतील मिरज येथे आजपासून होणार कोरोना व्हायरस टेस्ट

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 03, 2020 11:51 AM 2019-02-12T14:15:30+5:30

सांगलीतील मिरज येथे आजपासून होणार कोरोना व्हायरस टेस्ट

शहर : सांगली

राज्यात कोरोनाचे संकट कायम आहे. अनेक जिल्ह्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहे. मात्र, कोरोना व्हायरसची चाचणी केवळ पुण्यात होत होती. त्यामुळे कोरोनाचे रिपोर्ट येण्यास उशीर होत होता. आता जिल्ह्यातील मिरज येथे आजपासून कोरोना व्हायरसची तपासणी केली जाणार आहे. याचा लाभ पाच जिल्ह्यांना होणार आहे.

कोरोनाच्या तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात अद्ययावत कोरोना तपासणी प्रयोगशाळेला पुण्याच्या व्हायरॉलॉजी इन्स्टिटय़ूट (NIV) कडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता  सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या सॅम्पल्सची तपासणी मिरजेत करण्यात येणार आहे. त्यामुळे आता  चार ते सहा तासात कोरोना टेस्ट रिपोर्ट मिळणार असून आता पुण्याला पाठवायची गरज भारणार नाही. त्यामुळे कोरोना संशयिताबाबत निदान लवकर होणार आहे. तसेच पुण्यातील ताणही कमी होणार आहे.

दरम्यान,  सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये २४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. या घटनेची अतिशय गांभीर्याने दखल घेऊन मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचं रुपांतर आता कोरोना रुग्णालयात करण्यात आले आहे, अशी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली. आता मिरज येथे कोरोना व्हायरसची चाचणीही केली जाणार आहे.

इस्लामपूरमध्ये अचानकपणे वाढलेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात येताच मुंबईतील जे.जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. डॉ. पल्लवी सापळे यांनी तातडीने मिरज येथे भेट देत तेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे तातडीने ३०० खाटांची व्यवस्था असणाऱ्या कोरोना रुग्णालयात रुपांतर केले आहे. त्यामुळे येथे कोरोना चाचणी गरज भासणार होती. ही गरज आता पूर्ण झाली आहे. मिरजमधील या रुग्णालयात पंधरा आय.सी.यू . बेड, सिटी स्कॅन, एम.आर.आय. या सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

 

मागे

मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, इतर कर्मचारी १४ दिवस क्वारंटाईन
मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, इतर कर्मचारी १४ दिवस क्वारंटाईन

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत ....

अधिक वाचा

पुढे  

एकजुटीने कोरोनाचा अंधार मिटवूया; मोदींचा देशाला संदेश
एकजुटीने कोरोनाचा अंधार मिटवूया; मोदींचा देशाला संदेश

जनतेची सामूहिक शक्ती दिव्य आहे. कोरोनाला प्रकाशाची ताकद दाखवूया. १३० कोटीं....

Read more