By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 17, 2020 02:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
COVID-19 अर्थात कोरोना व्हायरससंबंधी एक चांगली बातमी समोर आली आहे. कोरोना व्हायरसवर औषध तयार केल्याचा दावा चीनकडून करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात चीन या औषधाची क्लिनिकल ट्रायल करण्याची शक्यता आहे. चीनमधून सुरु झालेल्या या महामारीवरील औषधाचा, अनेक देशांकडून शोध सुरु आहे. पण चीनने या संसर्गावरील वॅक्सिनबाबतची संशोधन प्रक्रिया योग्यरित्या पुढे गेली असून याची लवकरच चाचणी करण्यात येण्याचा दावा केला आहे. ग्लोबल सोर्सेजने दिलेल्या माहितीनुसार, औषधाच्या चाचणीनंतरही औषधं बाजारात येण्यास किती वेळ लागेल हे सांगणं मुश्किल असल्याचं म्हटलंय.
चीनमधील औषधावर अनेक शोध सुरु आहेत. जगभरात पसरलेल्या या संसर्गाने आतापर्यंत ५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही ठोस औषध तयार करण्यात आलेलं नाही. पण चीनने कोरोना व्हायरसवरील औषध तयार करण्याबाबतचं संशोधन पुढे गेल्याचा, वाढत गेल्याचा दावा केला आहे. लवकरच यावरील वॅक्सिनची चाचणी करण्यात येण्याबाबत चीनकडून सांगण्यात आलं आहे.
CHINA ANNOUNCES "SIGNIFICANT PROGRESS" IN THE INSTALLATION OF A CORONA VACCINE AND REVEALS THE START DATE OF ITS CLINICAL TRIALS#BreakingNews #COVID19
— First Squawk (@FirstSquawk) March 16, 2020
काय आहे क्लिनिकल ट्रायल -
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लिनिकल ट्रायल म्हणजेच संशोधनाच्या आधारे औषधं तयार करण्यात आली आहेत. आता ही औषधं मल्टीपल सोर्स म्हणजे जनावरांवर टेस्ट केली जातील. कोरोनाग्रस्त रुग्णावर कोणतं औषध कधी आणि किती परिणामकारक ठरतं याबाबत या टेस्टमधून अंदाज लावला जातो.
पण ही एक लांब, मोठी प्रक्रिया आहे. औषधांची यशस्वी चाचणी (ट्रायल) झाल्यानंतरच ही औषधं बाजारात आणली जातात. यशस्वी चाचणीनंतरही औषधं बाजारात येण्यासाठी कमीत कमी ३ महिन्यांचा कालावधी लागतो.
CHINA'S VACCINE CLINICAL TESTS AND TRIAL TO START FROM APRIL#BreakingNews
— First Squawk (@FirstSquawk) March 16, 2020
इस्राईलचाही दावा -
चीनआधी इस्त्राईलकडूनही या संसर्गावरील औषध बनवल्याचा दावा करण्यात आला आहे. इस्त्राईलच्या इस्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्चच्या वैज्ञानिकांनी, कोरोना व्हायरसवरील औषध शोधल्याचं सांगितलं आहे. वैज्ञानिकांनी या व्हायरसवर लस बनवण्यात आली असून लवकरच याला अधिकृत मान्यता देण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
इस्त्राईलचे संरक्षण मंत्री नेफटाली बेनिट Naftali Bennett यांनी, आमच्या वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरसवर संशोधन करुन या व्हायरसचं स्वरुप जाणून घेतलं आहे. कोरोना व्हायरसच्या जैविक तंत्राबाबत (Biological System) बारकाईने अभ्यास करुन ते ओळखण्यात यश मिळालं असल्याचं ते म्हणाले.
भारतातही संशोधन सुरु -
भारतातही कोरोना व्हायरसवरील औषध तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. एम्समधील डॉक्टरांनी लवकरच यावर काहीतरी तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. परंतु अशा परिस्थितीत लोकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. स्वत:ला सुरक्षित ठेवणं, हाच या संसर्गापासून सुरक्षित राहण्याचा उपाय आहे.
एका अदृश्य व्हायरसनं अख्ख्या जगाला वेठीला धरलं आहे. इटलीमध्ये एका दिवसात ३....
अधिक वाचा