ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोविड-१९चा धोका : राज्यात ३ हजार ५८० नवे कोरोनाबाधित

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 25, 2020 01:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोविड-१९चा धोका : राज्यात ३ हजार ५८० नवे कोरोनाबाधित

शहर : मुंबई

गेल्या २४ तासात महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) हजार ५८० नवे कोरोनाबाधित (corona affected) आढळले. तर ८९ रुग्णांचा कोरोनामुळे (Covid-19) मृत्यू झाल्याची नोंद झाली. याशिवाय, हजार १७१ जणांनी कोरोनावर (Corona Virus) मात केल्याने त्यांना डिस्चार्जही मिळाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १९ लाख हजार ९५१ झाली आहे. तर, सध्या राज्यात ५४ हजार ८९१ अॅक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत कोरोनावर (coronavirus) मात केलेल्या १८ लाख हजार ८७१ जणांना डिस्चार्जही मिळाला आहे.

तर मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा वेग अद्याप नियंत्रणात असून चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण बाधित आढळण्याचे प्रमाण पाच टक्क्यांच्या खालीच आहे. चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याचे प्रमाण आणखी घसरले असून ते १२.७३ टक्के झाले आहे. गुरुवारी ६४३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून १२ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील एकूण बाधितांची संख्या लाख ८९ हजारांवर गेली आहे. तर एका दिवसात ७११ रुग्ण बरे झाले. त्यामुळे आतापर्यंत लाख ६९ हजार म्हणजेच ९३ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, वर्षअखेर आणि नववर्ष स्वागतासाठी होणाऱ्या धिंगाण्याच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यू लावला असताना मास्कशिवाय फिरणाऱ्यांविरोधातही पालिकेने तीव्र कारवाईला सुरुवात केली आहे. एप्रिलपासून सुरु असलेल्या कारवाईत आतापर्यंत लाख २० हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यातून १६ कोटी ७६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. लोणावळ्यात जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. ख्रिसमस, न्यू इअरच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. पर्यटकांची गर्दी होत असल्याने प्रशासनाने निर्णय घेतला आहे.लोणावळ्यात नाईट कर्फ्यूचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत.

नाताळचा सण हे वसईचे खास आकर्षण. यंदा करोनाच्या संकटामुळे वसईकरांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. संभाव्य धोका ओळखून सर्व चर्चनी अनेक निर्बंध घातले आहेत. ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली असली तरी यंदा हा सण अत्यंत साधेपणाने साजरा होईल. वसई-विरार शहरात दरवर्षी नाताळ सण मोठय़ा उत्साहात साजरा होत असतो. करोनाचे सावट नाताळ सणावरही आहे. धोके टाळण्यासाठी चर्चने स्वयंशिस्तीने निर्बंध लावले असून वसईतील ख्रिस्ती बांधवांनी देखील या नियमांचे पालन सुरू केले आहे.

मागे

New Strain : इंग्लंडहून महाराष्ट्रात परतलेल्यांच्या शोधासाठी धावाधाव
New Strain : इंग्लंडहून महाराष्ट्रात परतलेल्यांच्या शोधासाठी धावाधाव

दक्षिण आफ्रिका देशातून आलेल्या प्रवाशांच्यामाध्यमातून ब्रिटनमध्ये नव्य....

अधिक वाचा

पुढे  

नाशिकची सिंगल वॉर्ड पद्धत कुणाला सत्ताधीश करणार?
नाशिकची सिंगल वॉर्ड पद्धत कुणाला सत्ताधीश करणार?

अवघ्या दीड वर्षावर येऊन ठेपलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीत वॉर्ड रचना अर....

Read more