By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 22, 2020 03:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
जगभरात थैमान घालणाऱ्या Corona कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी आता भारतातील प्रत्येक राज्यातही राज्य शासनाकडून काही कठोर पावलं उचलण्याच येत आहेत. महाराष्ट्र, मुंबईतही याचे पडसाद उमटले आहेत. ज्याअंतर्गत मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणारी लोकल सेवा बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. त्याचमागोमाग आता प्रशासन आणखी एक मोठा निर्णय घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.
कोरोनाचा विळखा इथेच थांबवण्यासाठी प्रशासनाकडून बेस्ट अर्थात BEST बस सेवाही बंद केली जाऊ शकते. रेल्वेनंतर मुंबईकरांकडून प्रवासाठी सर्वाधिक वापरात असणारी बेस्ट बस सेवा बंद केल्यास या शहराचा वेग मोठ्या फरकाने मंदावू शकतो. ३१ मार्चपर्यंत ही बससेवा बंद केली जाऊ शकते.
गर्दी टाळा, घरातून अधिक गरज असेल तरच बाहेर पडा अथवा प्रवास टाळा असं वारंवार सांगितलं जात असताना आणि खुद्द दिग्गजांनी आवाहन केलेलं असतानाही मुंबईचा वेग काही केल्या मंदावत नव्हता. मुख्य म्हणजे सार्वजनिक ठिकाणांवर असणारी गर्दी सातत्याने आहे त्याच परिस्थितीत दिसत होती. अर्थात काही ठिकाणं याला अपवादही होती. पण, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून परिस्थिती हाताबाहेर न जावी यासाठीच आता थेट प्रवासाची काही माध्यमंच बंद करण्याची पावलं उचलली जात आहेत.
बेस्ट बससेवा बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला तरीही काही बस गाड्या मात्र सुरु राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यामध्ये जवळपास ३ हजार २०० बेसट बस वाहनांपैकी काही वाहनं ही अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरु ठेवण्याचा विचार केला जाऊ शकतो. दरम्यान या साऱ्यामध्ये रुग्णवाहिकांची सेवा ही सुरुच राहणार आहे. आता या निर्णयाच्या अधिकृत घोषणेकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्रात कोरोनाने दुसरा बळी घेतला आहे मुंबईत 63 वर्षीय कोरोनाबाधित रुग....
अधिक वाचा