ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्रातील मृतांचा आकडा चारवर, वाशीतील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 26, 2020 11:12 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्रातील मृतांचा आकडा चारवर, वाशीतील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

शहर : मुंबई

महाराष्ट्रातील कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे. कारण महाराष्ट्रात चौथ्या कोरोनाबाधिताचा  मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत 65 वर्षीय एका कोरोनाबाधित महिलेने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट होत आहे. पीडित महिला वाशी इथली रहिवासी होती. तिच्यावर आधी खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर तिला कोरोनावरील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्याने तिचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले. या महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट २४ मार्चला आला होता. आज अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या १२४ वर

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 124 वर पोहोचली आहे. मुंबई-ठाण्यात प्रत्येकी एका नव्या रुग्णाला ‘कोरोनाची लागण झाली आहे. काल दिवसभरात 15 नवे रुग्ण आढळल्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 122 वर गेली होती. (Maharashtra Corona Case Update)

सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं काल समोर आलं होतं. या कुटुंबातील चौघांना आधीच कोरोना झाला होता. त्यानंतर कुटुंबातील आणखी पाच सदस्यांचे अहवालही पॉझिटिव्ह आले. मुंबईत आणखी 9 जणांना, तर ठाण्याच्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

पुण्याच्या नायडू रुग्णालयातून काल (बुधवार 25 मार्च) पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

 

मुंबई – 51

पुणे – 19

पिंपरी चिंचवड – 12

सांगली – 9

कल्याण – 5

नवी मुंबई – 5

नागपूर – 4

यवतमाळ – 4

अहमदनगर – 3

ठाणे – 5

सातारा – 2

पनवेल – 1

उल्हासनगर – 1

वसई विरार – 1

औरंगाबाद – 1

रत्नागिरी – 1

एकूण 124

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च – कोरोनामुक्त

पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च

पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च

पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च

मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च

नागपूर (1) – 12 मार्च

पुणे (1) – 12 मार्च

पुणे (3) – 12 मार्च

ठाणे (1) – 12 मार्च

मुंबई (1) – 12 मार्च

नागपूर (2) – 13 मार्च

पुणे (1) – 13 मार्च

अहमदनगर (1) – 13 मार्च

मुंबई (1) – 13 मार्च

नागपूर (1) – 14 मार्च

यवतमाळ (2) – 14 मार्च

मुंबई (1) – 14 मार्च

वाशी (1) – 14 मार्च

पनवेल (1) – 14 मार्च

कल्याण (1) – 14 मार्च

पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च

औरंगाबाद (1) – 15 मार्च

पुणे (1) – 15 मार्च

मुंबई (3) – 16 मार्च

नवी मुंबई (1) – 16 मार्च

यवतमाळ (1) – 16 मार्च

नवी मुंबई (1) – 16 मार्च

मुंबई (1) – 17 मार्च

पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च

पुणे (1) – 18 मार्च

पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च

मुंबई (1) – 18 मार्च

रत्नागिरी (1) – 18 मार्च

मुंबई (1) – 19 मार्च

उल्हासनगर (1) – 19 मार्च

अहमदनगर (1) – 19 मार्च

मुंबई (2) – 20 मार्च

पुणे (1) – 20 मार्च

पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च

पुणे (2) – 21 मार्च

मुंबई (8) – 21 मार्च

यवतमाळ (1) – 21 मार्च

कल्याण (1) – 21 मार्च

मुंबई (6) – 22 मार्च

पुणे (4) – 22 मार्च

मुंबई (14) – 23 मार्च

पुणे (1) – 23 मार्च

मुंबई (1) – 23 मार्च

कल्याण (1) – 23 मार्च

ठाणे (1) – 23 मार्च

सातारा (2) – 23 मार्च

सांगली (4) – 23 मार्च

पुणे (3) – 24 मार्च

अहमदनगर (1) – 24 मार्च

सांगली (5) – 25 मार्च

मुंबई (9) – 25 मार्च

ठाणे (1) – 25 मार्च

मुंबई (1) – 26 मार्च

ठाणे (1) – 26 मार्च

एकूण – 124 कोरोनाबाधित रुग्ण

मागे

देशात कोरोनाची रुग्णसंख्या ६०० वर तर मुंबईत आकडा पन्नाशीपार
देशात कोरोनाची रुग्णसंख्या ६०० वर तर मुंबईत आकडा पन्नाशीपार

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. स्पेन, इटली आणि अमेरिकेतील स्थिती ....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईतील भाजीपाला मार्केट सुरु, नागरिकांना दिलासा
मुंबईतील भाजीपाला मार्केट सुरु, नागरिकांना दिलासा

भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद....

Read more