ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एकजुटीने कोरोनाचा अंधार मिटवूया; मोदींचा देशाला संदेश

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 03, 2020 11:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30

एकजुटीने कोरोनाचा अंधार मिटवूया; मोदींचा देशाला संदेश

शहर : देश

जनतेची सामूहिक शक्ती दिव्य आहे. कोरोनाला प्रकाशाची ताकद दाखवूया. १३० कोटींची जनता एकाच संकल्पासोबत उभी राहणं गरजेचं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या व्हिडिओत सांगितलं. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात आपण कुणीही एकट नाही. आपण आपल्या घरात एकटे नाहीत. १३० कोटींची जनता प्रत्येकासोबत आहे. या कोरोनाशी आपण लढूया, अशा शब्दात मोदींनी देशातील लोकांशी संवाद साधला आहे.

१३० कोटी जनतेची सामुहिक दिव्य शक्ती आपण कोरोनाशी लढण्यासाठी एकत्र आणूया. याकरता पंतप्रधान मोदींनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता जनतेला आपली ९ मिनिटे देण्यासाठी सांगितली आहे. यावेळी सगळ्यांनी आपापल्या घरातील लाईट बंद करायची आहेत. यावेळी घराच्या दाराजवळ किंवा घराच्या बाल्कनीमध्ये उभं राहून हातात मेणबती, टॉर्च किंवा मोबाइलचे लाईट घेऊन वातावरण प्रकाशमय करायचं आहे. कोरोनाला आपण प्रकाशाची ताकद दाखवूया आणि कोरोनाशी लढूया असा संदेश मोदींनी यावेळी दिला.

                             

मात्र 'जनता कर्फ्यू'च्या वेळी नागरिकांनी केलेल्या चुका पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी देखील घेण्यास सांगितली आहे. कुणीही एकत्र यायचं नाही. घराच्या बाहेर कुणीही पडायचं नाही. आपापल्या घरी राहून सोशल डिस्टन्शिंगचं पालन करत ही नऊ मिनिटे प्रकाशमय करायची आहेत.

त्याचप्रमाणे यावेळी मोदींनी कोरोनाचा फटका हा सर्वाधिक गरिबांना झाल्याचं मान्य केलं. आपण पाहिलंच लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात गरिब स्तलांतरित झाले. यामुळे त्यांना खूप मोठा फटका बसला आहे. पण कुणीही एकट नाही. कोरोनाशी लढण्यासाठी १३० कोटीची जनता एकमेकांसोबत एकत्र आहे. आपण आपल्या घरात एकटे नाहीत ही १३० कोटीची जनता प्रत्येकासोबत असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं.

 

मागे

सांगलीतील मिरज येथे आजपासून होणार कोरोना व्हायरस टेस्ट
सांगलीतील मिरज येथे आजपासून होणार कोरोना व्हायरस टेस्ट

राज्यात कोरोनाचे संकट कायम आहे. अनेक जिल्ह्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळू....

अधिक वाचा

पुढे  

पंतप्रधान मोदींच्या संदेशातील महत्त्वाचे मुद्दे
पंतप्रधान मोदींच्या संदेशातील महत्त्वाचे मुद्दे

कोरोना Coronavirus व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन....

Read more