ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लस घेतल्यानंतरही मुंबईतील दोन पोलिसांना कोरोना; चिंता वाढली

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 20, 2021 11:19 AM 2019-02-12T14:15:30+5:30

लस घेतल्यानंतरही मुंबईतील दोन पोलिसांना कोरोना; चिंता वाढली

शहर : मुंबई

कोरोनाची लस घेतल्यानंतरही पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याचं उघड झालं आहे. पुण्यातील एका नर्सला कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं होतं. ही घटना ताजी असतानाच आता घाटकोपर पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांनाही कोरोनाची लस घेतल्यानंतर लागण झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. (Covid-19: Mumbai Two Vaccinated Cops Test Positive For Covid 19)

हे दोन्ही पोलीस कॉन्स्टेबल घाटकोपर पोलीस ठाण्यातील आहेत. त्यांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला होता. मात्र, त्यानंतरही त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे जाणवत होते. यापैकी एका पोलिसाला चार ते पाच दिवसांपासून करोनासदृष्य लक्षणे दिसत होती. त्यामुळे 18 फेब्रुवारी रोजी त्यांची कोरोनाची चाचणी केली होती. यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे घाटकोपर पोलीस ठाण्याचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर या दोन्ही पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे घाटकोपर पोलिसांनी सांगितले.

पुणे, नाशिकमध्ये लस टोचल्यानंतरही कोरोना

या आधी लस टोचल्यानंतरही कोरोना पुण्यात ससून रुग्णालयातील एका नर्सलाही पुन्हा कोरोना झाला आहे. विशेष म्हणजे कोरोनाची लस घेतल्यानंतरही या नर्सला कोरोनाची लागण झाली आहे. नर्सला कोरोनाची लस टोचल्यानंतरही तिला कोरोनाची लागण झाली असेल तर त्याने घाबरून जाण्याची गरज नाही. या नर्सने आतापर्यंत कोरोनाचा पहिलाच डोस घेतला आहे. दुसरा डोस बाकी आहे, असं ससूनचे डीन मुरलीधर तांबे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयातही एका फार्मसिस्टला कोरोनाचं इंजेक्शन देण्यात आलं होतं. पण दुसरा डोस घेण्यापूर्वीच तो एका कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला होता. त्यानंतर त्याची टेस्ट केली असता त्याला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं होतं. तर अमरावतीतही जिल्हा रुग्णालयातील 12 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाली होती. त्यावर सिव्हिल सर्जन निकम यांनी या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचा आणि कोरोना लसीचा काही संबंध नसल्याचं सांगितलं. कोरोना होऊ द्यायचा नसेल तर दोन डोसचा कोर्स पूर्ण करणं गरजेचं आहे, असं निकम म्हणाले.

कोरोनातून बरे झाल्यावरही कोरोना

राज्याचे जलसंपदा व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनाही कोरोना झाला आहे. त्यांना यापूर्वी कोरोनाची लक्ष जाणवली होती. त्यावर त्यांनी उपचारही घेतले होते. तसेच नागपूरमध्ये पाच डॉक्टरांना उपचारानंतर पुन्हा कोरोना झाला आहे.

चेंबूरमध्ये चार इमारती सील

मुंबईत काल 823 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चेंबूर येथे कोरोनाचे रुग्ण अधिक असल्याने या ठिकाणच्या चार इमारती सील करण्यात आल्या आहेत. 14 दिवसांसाठी या इमारती सील करण्यात आल्या आहेत. या इमारतीत राहणाऱ्या लोकांना घरातूनच काम करावं लागत असून जेवणही ऑनलाईन मागवावं लागत आहे. चेंबूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या परिसरात कडक निर्बंध घालण्यात आले असून परिसरात शुकशुकाट पसरला आहे. (Covid-19: Mumbai Two Vaccinated Cops Test Positive For Covid 19)

 

मागे

'उत्तरपत्रिकेत काहीही लिहा गुण मिळतील; पण रिकामं सोडू नका
'उत्तरपत्रिकेत काहीही लिहा गुण मिळतील; पण रिकामं सोडू नका

CBSE आणि महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. CBSE बोर्ड....

अधिक वाचा

पुढे  

राजकीय नेते कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत : मंत्री विश्वजीत कदम
राजकीय नेते कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत : मंत्री विश्वजीत कदम

महाविकास आघाडीमधील जवळपास 56 टक्के मंत्री कोरोनाने बाधित झाले आहेत तर आणखीह....

Read more