ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अपु-या मनुष्यबळामुळे कोविड केअर सेंटर खासगी संस्था चालवणार, दहा कोटीचा खर्च अपेक्षित

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2020 08:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अपु-या मनुष्यबळामुळे कोविड केअर सेंटर खासगी संस्था चालवणार, दहा कोटीचा खर्च अपेक्षित

शहर : पुणे

पिंपरी चिंचवड येथील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने 16 ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले आहेत. मात्र, मनुष्यबळाअभावी ते खासगी रुग्णालये, स्वयंसेवी किंवा सामाजिक संस्थांना तीन महिने कालावधीसाठी चालविण्यास देण्यात येणार आहेत. यासाठी सहा संस्था पुढे आल्या असून, त्यांना कामाचा आदेशही दिला आहे. यासाठी सुमारे दहा कोटी 12 लाख 23 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

महापालिकेने डी. वाय. पाटील मुलींचे वसतिगृह रावेत, मागावसर्गीय मुलांचे वसतिगृह मोशी, सामाजिक न्याय विभागाचे वसतिगृह मोशी, घरकुल इमारत क्रमांक डी पाच ते आठ, बी 10 12, बालाजी लॉ कॉलेज ताथवडे, म्हाडा वसाहत महाळुंगे सी-11, बी-11 12, -11, बालेवाडी स्पोर्टस्कॉम्प्लेक्, पीसीसीओपी वसतिगृह आकुर्डी, इन्फ्रास्ट्रक्चर लोकोटेड आणि हॉटेल क्रिस्टल कोर्ट आदी ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले आहेत.ते चालविण्यासाठी ट्रस्ट हेल्थ केअर, आयकॉन हॉस्पिटल, डीवाईन हॉस्पिटल, डॉ. भिसे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, रुबी अलकेअर सर्विसेस, बीव्हीजी इंडिया, आयुश्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि एक्सटेन्सिबल सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी कंपनी या संस्था तयार झाल्या आहेत. त्यांना प्रतिबेड प्रतिदिवस मंजूर दराप्रमाणे तीन महिने कालावधीसाठी शुल्क दिले जाणार आहे. ठिकाण बेडच्या संख्येनुसार एका बेडचे एका दिवसाचे शुल्क ठरविण्यात आले आहे.

कोविड केअर सेंटर शुल्क

बेड क्षमता : शुल्क (प्रतिबेड)

100 : 699

200 : 543

300 : 500

कोविड केअर सेंटर

एकूण सेंटर : 16

संचालक संस्था : 6

एकूण बेड : 3500

अपेक्षित खर्च : 10,12,23,000

मागे

तर...जनतेवर बेकारीची परिस्थिती येईल ! रेल्वेसेवेसाठी ठाकूरांचे सरकारकडे साकडं
तर...जनतेवर बेकारीची परिस्थिती येईल ! रेल्वेसेवेसाठी ठाकूरांचे सरकारकडे साकडं

गेल्या सहा ते सात महिन्यांपासून लोकल सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद अस....

अधिक वाचा

पुढे  

श्रीमंत मराठा आमदारांना आरक्षण नकोय - प्रकाश आंबेडकर
श्रीमंत मराठा आमदारांना आरक्षण नकोय - प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्रातल्या श्रीमंत मराठा आमदारांनाच आरक्षण नकोय, असं वक्तव्य वंचित ....

Read more