ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८३,८०९ नवे रुग्ण; भारताने ४९ लाखांचा टप्पा ओलांडला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 15, 2020 11:17 AM 2019-02-12T14:15:30+5:30

गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८३,८०९ नवे रुग्ण; भारताने ४९ लाखांचा टप्पा ओलांडला

शहर : देश

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोना व्हायरसच्या ८३,८०९ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर उपचार सुरु असलेल्या १०५४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ४९,३०,२३७ वर जाऊन पोहोचला आहे. यापैकी ,९०,०६१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ३८,५९, ४०० जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत देशातील ८०,७७६ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सोमवारी संसदेत देशातील कोरोनाच्या सद्यस्थितीसंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाच्या प्रसाराचा वेग कमी असल्याचा दावा केला होता. तसेच कोरोनाचे बहुतांश रुग्ण हे महाराष्ट्र, ओडिशा, आसाम, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि दिल्लीत असल्याचे त्यांनी म्हटले होते. जगातील इतर देशांची तुलना करता भारताने कोरोनाच्या संसर्गाला आणि मृत्युदराला बऱ्याच अंशी आळा घातल्याचेही डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले होते. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणारे राज्य आहे. सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या १७,०६६ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर २५७ जणांचा मृत्यू झाला होता. राज्यात लाख ५५ हजार ८५० जण करोनामुक्त झाले असून, राज्याचा रिकव्हरी रेट ७०.१६ टक्के आहे.

 

मागे

केंद्र सरकारकडून कांदा निर्यातबंदी, कांद्याचे भाव कोसळले
केंद्र सरकारकडून कांदा निर्यातबंदी, कांद्याचे भाव कोसळले

केंद्र सरकारने निर्यातीसाठी पाठवलेला कांदा मुंबई पोर्ट आणि बांग्लादेश बॉ....

अधिक वाचा

पुढे  

मुघल संग्रहालयाला योगी सरकारने दिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव
मुघल संग्रहालयाला योगी सरकारने दिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलण्यात आलं आहे. मोघल ....

Read more