By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 19, 2020 11:05 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गेल्या २४ तासांत देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचे ९० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारताने ५३ लाख कोरोना रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात प्रत्येक दिवशी जवळपास लाखाच्या घरात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ९३,३३७ रुग्णांची नोंद झाली. तर उपचार सुरु असलेल्या १२४७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५३,०८,०१५ इतकी झाली आहे. यापैकी १०,१३,९६४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर देशातील ४२,०८,४३२ जणांना कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत कोरोनामुळे देशातील ८५,६१९ जणांनी प्राण गमावले आहेत.
तर दुसरीकडे देशात करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वेगानं वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात विक्रमी ९५ हजार ८८० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
India's #COVID19 case tally crosses 53-lakh mark with a spike of 93,337 new cases & 1,247 deaths in last 24 hours.
— ANI (@ANI) September 19, 2020
The total case tally stands at 53,08,015 including 10,13,964 active cases, 42,08,432 cured/discharged/migrated & 85,619 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/wKo1vgDc1Y
महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा वेगाने फैलाव होताना दिसत आहे. तसेच मुंबईतही कोरोना व्हायरसने उसळी घेतली आहे. त्यामुळे राज्यातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या जवळपास दोन लाखांवर पोहोचली आहे.
राज्यात पहिलीतल्या प्रवेशासाठी आता जन्मतारखेचा निकष पुन्हा बदलण्यात आला ....
अधिक वाचा