ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चिंताजनक... देशात कोरोना रुग्णांची संख्या १० लाखांच्या वर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 18, 2020 09:01 AM 2019-02-12T14:15:30+5:30

चिंताजनक... देशात कोरोना रुग्णांची संख्या १० लाखांच्या वर

शहर : देश

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. देशात कोरोना रुग्णांनी १० लाखांचा आकडा पार केला आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये जवळजवळ १ लाख नागरिक कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ३६ हजार ९५६ जणांना कोरोनाची बाधा झाली असून ६८७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोना व्हायरस महामारीमुळे देशाला असंख्य संकटांना सामोरे जावे लागत आहे.

देशात सर्वात जास्त कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. सध्या ठाणे जिल्ह्यातील रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ठाण्या पाठोपाठ हैदराबादमध्ये रुग्णांची संख्या जास्त आहे. याठिकाणी २८ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

भारतात एकूण कोरोना रुग्णांची संख्या १० लाख ३८ हजार ८३२ वर पोहोचली असून ३ लाख ४२ हजार ४७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशा कठीण प्रसंगी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात ज्या वेगात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याहूनही अधिक वेगात रुग्ण कोरोनावर मात करत आहेत.

देशात आतापर्यंत ६ लाख ३५ हजार ७५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत २५ हजार ६०२ रुग्णांनी कोरोना व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहे.

 

मागे

कोरोनाचे विघ्न टाळण्यासाठी कोकणसाठी मुख्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश
कोरोनाचे विघ्न टाळण्यासाठी कोकणसाठी मुख्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश

कोकणातल्या गावोगावच्या दक्षता समित्या, गणेश मंडळे यांच्याकडून आपापल्या ग....

अधिक वाचा

पुढे  

फोर्ट इमारत दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख; जखमींना ५० हजारांची मदत
फोर्ट इमारत दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख; जखमींना ५० हजारांची मदत

शहरातील फोर्ट भागातील भानुशाली इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ....

Read more