ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

COVID19 : महाराष्ट्र सरकारची नवी नियमावली, उद्यापासून होणार लागू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 24, 2020 10:58 AM 2019-02-12T14:15:30+5:30

COVID19 : महाराष्ट्र सरकारची नवी नियमावली, उद्यापासून होणार लागू

शहर : मुंबई

कोरोनाची (COVID19) दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्याची येत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) नवी नियमावली (New Regulations) जाहीर केलीय. या अंतर्गत बाहेरील राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी काही निर्बंध लागू केलेले आहेत. दिल्ली, एनसीआर, गुजरात, राजस्थान आणि गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आलीय. ही टेस्ट निगेटीव्ह आली तरच राज्यात प्रवेश दिला जाणार आहे.

मुंबईची वाटचाल दिल्लीच्या दिशेने होवू नये, यासाठी मुंबई महापालिकेनं (BMC) आता कंबर कसलीय. दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्या वाढीचा आलेख चढता राहत असल्यानं पालिका प्रशासन अलर्ट झालंय. परिस्थिती हाताबाहेर जावू नये, याकरता मोठ्या प्रमाणात स्क्रिनिंग, टेस्टिंगवर भर दिला जात आहे. तसंच मास्क न वापरणा-यांविरोधातही मोहीम तीव्र करण्यात आलीय.आता मुंबईतल्य़ा हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणा-या कर्मचा-यांचीही कोरोना चाचणी सुरू करण्यात आलीय.

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य सज्ज नसतील तर डिसेंबरमध्ये परिस्थिती आणखी बिकट होईल असं सुप्रीम कोर्टाने खडसावलं. केंद्र आणि राज्य सरकारला दोन दिवसांत कोरोनाबाबतच्या तयारीचा अहवाल देण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. गुजरात, दिल्ली, महाराष्ट्रातली परिस्थिती हाताबाहेर गेली आहे का ? असा सवाल कोर्टाने विचारला. कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज आहे असं कोर्टाने खडावलं आहे. अहवाल आल्यावर पुढील सुनावणी २७ नोव्हेंबरला होणार आहे.

 

मागे

रत्नागिरीत सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद होण्याच्या मार्गावर?; आज निर्णय होणार
रत्नागिरीत सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद होण्याच्या मार्गावर?; आज निर्णय होणार

कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या शाळा अखेर 23 नोव्हेंबर (Maharashtra Schools Re-Open) ....

अधिक वाचा

पुढे  

पुणेकरांनो सावधान! कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढण्यास सुरुवात, बुधवारी एका दिवसात 1 हजार 25 रुग्ण!
पुणेकरांनो सावधान! कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढण्यास सुरुवात, बुधवारी एका दिवसात 1 हजार 25 रुग्ण!

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना पाहायला मिळतोय. पुण्यातही रु....

Read more