By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 18, 2020 12:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारतीय औषध महानियंत्रकांनी (ड्रग कंट्रोलर जनरल आॅफ इंडिया) मुंबईतील परळच्या केईएम रुग्णालयाला कोविशिल्ड लसीची चाचणी सुरू करण्यास सांगितले आहे. यापूर्वी, यूकेमध्ये आॅक्स्फर्डच्या या लसीचा एका रुग्णावर दुष्परिणाम झाल्यामुळे चाचणी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्रुटी दूर झाल्यानंतर शनिवारपासून ही चाचणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्र सरकारकडून मिळालेल्या संमतीनंतर आता केईएम रुग्णालय प्रशासनाने या लसीच्या चाचणीसाठी नोंदणी केलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी सुरू केली आहे. या चाचण्या झाल्यानंतर रुग्णालयातील एथिक कमिटीची परवानगी घेऊन लसीची चाचणी सुरू करण्यात येणार असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.
केईएम रुग्णालयाच्या एथिक कमिटीमध्ये डॉ. पद्मा मेनन यांचा समावेश आहे. याशिवाय नायर रुग्णालयातही लवकरच सर्व बाबींची पूर्तता करून लसीची चाचणी सुरू करण्यात येईल. आतापर्यंत या चाचणीसाठी १०० व्यक्तींनी नोंदणी केल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.
वाहन खरेदी मुहूर्त: सप्टेंबरमध्ये 19, 20, 27, 28, 29 तारखेला तर ऑक्टोबरमध्ये 4, 10 आणि 11 य....
अधिक वाचा