By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑक्टोबर 03, 2020 07:07 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोना विषाणूवरिल लस कोव्हिशिल्डच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला मुंबईतील केईएम आणि नायर रुग्णालयात सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 19 जणांना ही लस देण्यात आली आहे.ऑक्सफर्ड आणि सीरम इन्स्टीट्युट यांच्या मार्फत कोव्हिशिल्ड लस बनवण्यात येत आहे.
मुंबईतील केईएम रुग्णालयात आणि नायर रुग्णालयात 100 अशा एकूण 200 जणांना तिसऱ्या टप्प्यातील लस देण्यात येणार आहे. नायर रुग्णालयात कोव्हिशिल्ड लसीची चाचणी सुरु झालीय. आतापर्यंत 19 जणांना लस देण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने 100 जणांना लस देण्यात येणार आहे. लसीच्या चाचणीसाठी स्वंयसेवकांनी पुढे यावे, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले होते. रुग्णालयाच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. कोव्हिशिल्ड लसीच्या चाचणीसाठी 150 स्वंयसेवकांनी नोंदणी केली. आरटी-पीसीआर आणि अॅण्टिबॉडीज चाचणी करुन 100 स्वयंसेवकांची निवड करण्यात येणार आहे. मुंबईसह, पुणे, नागपूर म्हैसूर, चेन्नई येथील विविध रुग्णालयात कोव्हिशिल्ड लसीची चाचणी करण्यात येत आहे.
लसीचा दिलेल्या स्वंयसेवंकाची 1 महिन्यानंतर पुन्हा चाचणी
कोव्हिशिल्ड लस देण्यात आलेल्या 100 स्वंयसेवकांची एका महिन्यानंतर तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर येणाऱ्या निष्कर्षांवरुन पुढील प्रक्रिया निश्चित केली जाणार आहे.
भारतात तीन लसींची चाचणी सुरु
ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सीरम इन्स्टिट्युट यांच्या मार्फत कोव्हिशिल्ड तिसऱ्या टप्प्यात आहे. भारत बायोटेक इंटरनॅशनल संस्था बनवत असलेली ‘कोवॅक्सीन’ लस मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. झायडस कॅडिला ही संस्था देखील लस बनवत असून त्यांच्याही लसीची चाचणी सुरु आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीरम इन्स्टीट्युटला भेट दिली. यानंतर पत्रकारांशी बोलताना लस यायला जानेवारी उजाडेल, असे सांगितले.
लोकांनी मास्क वापरू नये यासाठी अखिल भारतीय स्वास्थ्य अभियानाकडून मरीन ड्र....
अधिक वाचा