ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

क्रॉफर्ड मार्केटमधील शॉपिंग सेंटरला आग !

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 22, 2019 12:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30

क्रॉफर्ड मार्केटमधील शॉपिंग सेंटरला आग !

शहर : मुंबई

दक्षिण मुंबई येथील क्रॉफर्ड मार्केटमध्ये  एका शॉपिंग सेंटरला आग लागली आहे. या घटनेत कोणाला काही नुकसान पोहचले नाही. मात्र या दुकानात असलेल्या वस्तू जळून राक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या एका आधिकाऱ्यानी सांगितले की, अब्दुल रेहमान स्ट्रीट वर हे शॉपिंग सेंटर आहे. माहितीनुसार सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही आग लागली आहे. थोड्या वेळातचं आगीने रौप्य रुप धारण केलं. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, या दुकानात कोणलाच काही नुकसान झाले नाही. मात्र या दुकानातील इलेक्ट्रॉनिक, प्लास्टिक, स्टेशनरी आणि इलेक्ट्रिक उपकरणांचा मोठा साठा होता. यामुळे आग वाढली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी अग्निशमन गाडी उपस्थित झाल्याएक तासानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवता आले आहे. .  आग कशामुळे लागली याचं कारण स्पष्ट झालं नाही. स्थानिक पोलिसांकडून या घटनेची कसून चौकशी केली जात आहे

 

मागे

मुंबईकरांच्या डोळ्यांत धूळफेक,नालेसफाईचे काम धिम्या गतीने
मुंबईकरांच्या डोळ्यांत धूळफेक,नालेसफाईचे काम धिम्या गतीने

पावसाळ्याला अवघे दोन महिने उरले असताना नालेसफाई यावर्षीही धिम्या गतीनेच स....

अधिक वाचा

पुढे  

राज्यात स्वाइनची दहशत कायम; १२० जणांचा बळी
राज्यात स्वाइनची दहशत कायम; १२० जणांचा बळी

वातावरणात बदल होत असल्याने राज्यात स्वाइन फ्लूची दहशत कायम आहे. जानेवारी त....

Read more