By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 02, 2024 12:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीच्या भरपाईची मागणी होत असतानाच राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. पीक नुकसान झाल्यानंतर मदतीची मर्यादा वाढवली गेली आहे.
जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजासाठी आनंदाची बातमी… राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे पीक नुकसान झाल्यानंतर मदतीची मर्यादा वाढवली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी निकषापेक्षा जास्त मदतीचा अध्यादेश शासनाने जारी केला आहे.
जिरायती जमीन जर तुम्ही पीक घेतलं असेल. त्या पिकाचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं असेल. तर तुम्हाला सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. प्रति हेक्टरी मर्यादा 8 हजारवरून 13 हजार पाचशेपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. ही मर्यादा दोन हेटक्टर पर्यंत असणार आहे.
दगडूशेठ, अंबाबाई, सिद्धीविनायक मंदिरात भाविकांची गर्दी; नवीन वर्षाच्या पहि....
अधिक वाचा