ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्र लॉकडाऊन, संचारबंदी लागू, आजपासून कोणकोणते बदल?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 24, 2020 09:57 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्र लॉकडाऊन, संचारबंदी लागू, आजपासून कोणकोणते बदल?

शहर : मुंबई

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यासही मज्जाव आहे. केवळ अत्यावश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडण्याची मुभा आहे. जिल्हा-जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.

खालील सेवा सुरु ठेवण्याची मुभा :

1. बँक, एटीएम, आर्थिक व्यवहाराशी निगडीत सेवा

2. प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक मीडिया

3. आयटी, टेलिकॉम, इंटरनेट सेवा

4. अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक

5. शेतीविषयक वस्तूंची वाहतूक

6. अन्नपदार्थ किंवा औषधाची वाहतूक करणाऱ्या ई-कॉमर्स सेवा

7. अन्नपदार्थ, किराणा, धान्य, दूध, पाव, फळे, भाज्या, अंडी, मासे, चिकन, मटण यांची दुकाने आणि वाहतूक

8. पशूंना आवश्यक वस्तूंची दुकाने आणि वाहतूक

9. उपाहारगृहांमधील पार्सल सेवा

10. हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर

11. पेट्रोल पंप, एलपीजी gas

12. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या संस्थांना असलेली खाजगी सुरक्षा व्यवस्था

-रेल्वे, लोकल, बस आणि खासगी वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. खासगी वाहनांना केवळ अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणासाठीच परवानगी असेल.

-रिक्षा-टॅक्सीतील प्रवाशांची संख्याही मर्यादित असेल. चारचाकी वाहनांमध्ये चालक अधिक 2 आणि रिक्षामध्ये चालक अधिक 1 अशी परवानगी दिली आहे, असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.

-सर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळे पूर्णपणे बंद राहतील. धर्मगुरुना धार्मिक विधी पार पाडण्याची परवानगी असेल

-खाजगी किंवा सरकारी रुग्णालयात निश्चित वैकल्पिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येतील

-सगळी दुकानं, ऑफिसेस, कंपन्या, मॅनिफॅक्च्युरिंग युनिट्स बंद राहतील.

सगळी सरकारी ऑफिसेस, दुकानं आणि संस्था कमीत कमीत कर्मचारीवृंदासह सुरु राहतील. मात्र दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी तीन फुटांचे अंतर हवे. अशा ठिकाणी हात धुण्याची सुविधा, तसंच हँड सॅनिटायझर हवे.

-कोरोनाबाधित रुग्ण न आढळलेले वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, सिंधुदुर्ग या कोरोनामुक्त जिल्ह्यात कोणतीही बाहेरील वाहतूक होणार नाही (वैद्यकीय कारण अपवाद)

संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक गोष्टींची कमतरता होणार नाही, यासाठी सरकार खास पावलं उचलणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

साथीचे रोग नियंत्रण अधिनियम 1897

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी देशात साथीचे रोग नियंत्रण अधिनियम 1897 (Epidemic diseases act, 1897) लागू करण्यात आला आहे. एखाद्या रोगाला आळा घालण्याचे प्रयत्न हतबल होत असल्यास हा कायदा लागू करण्याची तरतूद आहे.

                                 

मागे

कोरोना : संचारबंदीला न जुमानता मुंबईकर रस्त्यावर
कोरोना : संचारबंदीला न जुमानता मुंबईकर रस्त्यावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संचारबंदी जाहीर केल्यानंतरही मुंबईकर वाहनचाल....

अधिक वाचा

पुढे  

संचारबंदीनंतर राज्यातल्या शहरांत अशी आहे स्थिती
संचारबंदीनंतर राज्यातल्या शहरांत अशी आहे स्थिती

जमावबंदी आदेश लागू करूनही त्याचा उपयोग होत नसल्यानं राज्य सरकारनं मध्यरात....

Read more