ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तामिळनाडू, पुद्दुचेरीला पावसाने झोडपले, केरळ-तामिळनाडूतील 11 जिल्ह्यांमध्ये सुट्टी जाहीर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 04, 2020 11:29 AM 2019-02-12T14:15:30+5:30

तामिळनाडू, पुद्दुचेरीला पावसाने झोडपले, केरळ-तामिळनाडूतील 11 जिल्ह्यांमध्ये सुट्टी जाहीर

शहर : देश

निवार हे चक्रीवादळ (Nivar Cyclone) शांत होत नाही तोवर अजून एका मोठ्या चक्रीवादळाचा दक्षिण भारतातील राज्यांना धोका निर्माण झाला आहे. या चक्रीवादळाला बुरेवी (Cyclone Burevi) असं नाव देण्यात आलं असून आज (शुक्रवारी) ते केरळ आणि तमिळनाडूच्या (Tamil Nadu) किनाऱ्यावर धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. हे चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकण्यापूर्वी गुरुवारपासून मुसळधार पावसाने तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेतून हे वादळ पंबन येथे धडकणार असून तेथून ते कन्याकुमारीच्या तटवर्ती क्षेत्राकडे सरकणार आहे. चक्रीवादळामुळे कोडावसल, नागपट्टिणम, वदारनयाम, कराईकल, मुदुकुलाटून या कावेरी त्रिभुज परिसरात बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी 10 ते 20 सेमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

हवामान विभागाने तामिळनाडू आणि केरळ राज्यांच्या किनारी भागातील जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. बुरेवी चक्रीवादळ आज दुपारपर्यंत तिरुवनंतपुरमच्या किणाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. तिरुवनंतपुरम, कोल्लम, पठानमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, इडुक्की आणि एर्नाकुलममध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah ) यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार चक्रीवादळ बुरेवीवर (Cyclone Storm Burevi) लक्ष ठेवून आहेत. तसेच या काळात केंद्र सरकार तामिळनाडू आणि केरळमधील नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यास वचनबद्ध आहे. गृहमंत्र्यांनी याबाबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी (K. Palaniswami) आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांच्याशी फोनवर बातचित केली. दोन्ही मुख्यमंत्र्यांना शाह यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याची बातचित करुन त्यांना आश्वस्त केले होते.

दरम्यान, श्रीलंकेच्या उत्तरेकडील प्रांतात बुधवारी रात्री धडकलेल्या बुरेवी चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले नसले तरी पुढील 24 तास सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. श्रीलंकेतील त्रिंकोमाली जिल्ह्यातील थिरियाया आणि कुचचावेली गावांदरम्यान बुधवारी रात्री हे चक्रीवादळ धडकले, असे तिथल्या आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राच्या वतीने सांगण्यात आले आहे. श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 200 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

किनारी भागात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याचे प्रकार घडले आहेत, काही ठिकाणी घरांवरील छतांचे नुकसान झाले आहे. त्रिंकोमाली जिल्ह्यातील 12 घरे पाण्याखाली बुडाली आहेत. त्याचप्रमाणे जवळपास 650 कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाने किनाऱ्यांपासून दूरवर मदत छावण्या उभारल्या असून तेथे किनारी भागातील लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

मागे

डॉ. शीतल आमटेंची कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरुन आत्महत्या?
डॉ. शीतल आमटेंची कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरुन आत्महत्या?

आत्महत्येसाठी वापरलेले विष अत्यंत घातक शीतल आमटे यांनी आत्महत्येसाठी वा....

अधिक वाचा

पुढे  

'हम करे सो कायदा' चालणार नाही, पंजाबच्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला झुकवले; शिवसेनेचा हल्लाबोल
'हम करे सो कायदा' चालणार नाही, पंजाबच्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला झुकवले; शिवसेनेचा हल्लाबोल

केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्यांना (Agricultural law) विरोध करत पंजाबच्या शेतकऱ्य....

Read more