By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 06, 2019 02:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
भारतासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. ते आव्हान आहे वादळ. महा आणि बुलबुल ही दोन वादळाने आता विक्राळ रूप धारण केलय. या वादळांचा फटका अनेक राज्यांना, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, ओडिशा ही बसण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात हे चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे.
दरम्यान वादळाचा वेग 80 किलोमीटर प्रतितास असेल. 90 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहणार आहेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.या वादळामुळे गुजरात,कोकण किनारपटटीवर तुरळक ठिकाणी अति जोरदार, तर मध्य, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने 6 ते 8 नोव्हेंबर दरम्यान अर्लट जारी केला आहे. तसेच 9 ते 13 नोव्हेंबर रोजी पश्चिम बंगाल, ओदिशा, अंदमान-निकोबार आणि उत्तर-पूर्वेकडील राज्यांमध्ये जोरदार पर्ज्यनवृष्टी होण्याची शक्यता आहे.
देशातील प्रमुख सुमारे 15 बँकाची 7 हजार कोटी रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी के....
अधिक वाचा