By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 19, 2020 12:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव दुसऱ्या टप्प्यातच रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. सर्वसामान्य नागरिकांकडूनही सरकारला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गर्दी टाळण्यासाठी दादरच्या बाजारपेठांमधील 100 टक्के दुकानं बंद ठेवण्याचा स्तुत्य निर्णय दादर व्यापारी संघटनेने घेतला आहे.
गुढीपाडव्यापर्यंत दादरमधील सर्व दुकानं पूर्णत: बंद राहणार आहेत. प्रशासनाने एक दिवसाआड दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले होते, मात्र व्यापारी संघटनेने स्वत:हून पुढाकार घेत 100% दुकाने गुढीपाडव्यापर्यंत बंद ठेवणार असल्याचा निर्णय घेतला. ‘जी उत्तर’ वॉर्ड ऑफिसमध्ये पत्र देऊन व्यापारी संघटनेने आपला निर्णय कळवला.
याआधी, दादर, माहिममधील दुकानं बंद करण्यासाठी महापालिकेची पथकं रस्त्यावर उतरली होती. दुकानदारांनी आदेश पाळले नाहीत तर कारवाई करु, असं अधिकाऱ्यांनी सांगितले. दादरमधील सुविधा सेंटर, आयडियलच्या गल्लीतली दुकानं सकाळी सुरु होती. त्यामुळे पालिका अधिकारी रस्त्यावर उतरुन बंद करण्याचे आवाहन करत होते. एक दिवस आड दुकानं सुरु करण्यास सांगितले जात होतं.
मुंबईचे महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी विभागीय आयुक्तांना आपापल्या वॉर्डामधल्या बाजारपेठांची यादी आणि त्या कधी बंद ठेवता येतील, याचं नियोजन करण्याचे निर्देश दिले होते. रस्त्यांनुसार त्यावरील दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई महापालिका मुख्यालय आणि पालिकेच्या इतर कार्यालयांमध्येही अंशत: प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. महापालिका मुख्यालय, वॉर्ड ऑफिस, खाते कार्यालय या ठिकाणी देण्यात येणारी प्रवेशपत्रे पुढील सूचना येईपर्यंत बंद करण्यात आली आहेत.
महापौर, उपमहापौर, आयुक्त यांना बाहेरुन येणाऱ्या केवळ 10 व्यक्ती भेटू शकणार, तर अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त, समिती अध्यक्ष, उपायुक्त, खातेप्रमुख यांना बाहेरील केवळ 5 व्यक्तीच भेटू शकणार. इन्फ्रारेड थर्मामिटरच्या माध्यमातून शारीरिक तापमान तपासल्यानंतरच आत प्रवेश देण्यात येईल.
कोरोनाची लागण देशभरात पसरत आहे. देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख....
अधिक वाचा