By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 23, 2019 05:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आज श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा होत आहे. उद्या दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे. तथापि गेली काही वर्षे प्रचंड उत्साह गोविंदा पथकांमध्ये आणि आयोजकांमध्ये दिसत होता. तो उत्साह यावर्षी दिसत नाही. लवकरच होणार्याि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळी दहीहंडीला मोठ्या संख्येने आयोजक लाभतील अशी अपेक्षा होती. परंतु महाराष्ट्रात मुसळधार पावसाने कोल्हापूर, सांगली, कोकण परिसरात आलेला महापूर, उत्सव साजरा करण्यावर आलेले निर्बंध आदि कारणांमुळे आयोजकांनी या उत्सवाकडे पाठ फिरवलेली दिसते. त्याचबरोबर गोविंदा पथकांच्या संख्येतही घट झाल्याचे दिसत आहे. परिणामी या उत्सवातील उत्साह कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
मुंबईत सुमारे 900 हून अधिक गोविंदा पथके आहेत. मात्र आजपर्यंत फक्त 593 पथकानी अपघाती विमा उतरविला आहे. तर दीड हजार गोविंदानी नोंद केली आहे. गेल्यावर्षी 4819 गोविंदानी नोंद केली होती. म्हणजेच तरुण गोविंदानीहि या उत्सवाकडे पाठ फिरविल्याचे जाणवत आहे.
गेली काही वर्षे गोविंदा पथकांमध्ये आणि आयोजकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुरस सुरू झाली होती. त्यामुळे 9 ते 10 थरांपर्यंत मानवी मनोरे रचण्याची स्पर्ध्याच सुरू झाली होती. त्यातून जीवघेण्या घटना घडू लागल्या. तेव्हा न्यायालयाकडून निर्बंध आणले गेले. 14 वर्षाखालील मुलांना यात सामील न करणे , हंडी फोडणार्याय मुलासाठी हेल्मेट सेफ्टी बेल्ट , हरनेस बेल्ट, चेस्ट गार्ड आणि प्रोटेक्टरची सक्ती करण्यात आली. दुसरीकडे मनोर्यां ची स्पर्धा, होणारे अपघात, उत्सवाबद्दल निरुत्साह, नोकरी शिक्षणाचा ताण आदि कारणांमुळे तरुणांचा या उत्सवातील सहभाग कमी झाला आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवातील उत्साह दिसत नाही.
जवळचे भाडे नाकारणे , जादा भाडे आकारणीबाबत जाब विचारणार्यार प्रवाशांना मारह....
अधिक वाचा