By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 17, 2019 06:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : कोल्हापूर
कोल्हापूर-सांगलीतील अनेक गाव महापुराने उद्ध्वस्त झाली आहेत. या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले आहेत. राज्य शासनानेही तातडीची मदत म्हणून रोख ५ हजार आणि बँक खात्यात ५ हजार रुपये ठेवण्यात सुरुवात केली आहे. त्यासाठी गावपातळीवर पंचकामे करून मदत दिली जात आहे. परंतु कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात ज्यांच्या उमर्यालाही पाणी लागले नाही अशा लोकांनीच पूरग्रस्त म्हणून मदत मिळवण्याचे समोर आले आहे. यामुळे काही गावांमध्ये पूरग्रस्त संतप्त झाले असून वादावादी होत आहेत. खर्या पूरग्रस्तांना डावलल्याने शिरोळमधील नवे दानवाड गावात तुंबळ हाणामारी झाली.
शिरोळ तालुक्यात गाव पातळीवर तलाठी, ग्रामसेवकांना हाताशी धरून पूरग्रस्तांची आर्थिक मदत दुसऱ्यांच्या खिशात घालण्याचे प्रकार सुरू झाला आहे. कोल्हापूरच्या हातकंणगले तालुक्यातील रांगोळी गावातही पूरग्रस्तांचे मदत लाटण्याचा प्रकार पुढे आला आहे. शिरोळच्या जुने दानवाड गावामध्येही खर्या पूरग्रस्ताना डावळल्याने तुंबळ हाणामारी झाली. या गावात रेशन दुकानाचा परवाना असलेल्या आणि संस्थेचा सेक्रेटरी असलेल्या प्रकाश त्रिपाळंवार याच्या सांगण्यावरून तल्याठाने पूरग्रस्ताची यादी बनविण्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि त्रिपाळवार कुटुंबीय यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्वच्छ भारत अभियान' सुरू केले. तथापि महारा....
अधिक वाचा