By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 28, 2019 02:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
परळ, लालबाग, लोअर परळ, करी रोड, चिंचपोकळी या गिरणगावात मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत असतो. येथील गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीही धुमधडाक्यात काढण्यात येतात. मात्र यावर्षी येथील गणेश विसर्जन मिरवणुकीवर करी रोड व चिंचपोकळी येथील रेल्वे मार्गावरील धोकादायक पूलांमुळे बंधने आली आहेत. साहजिकच तेथील विसर्जन मिरवणुकीसाठी काही पर्यायी मार्गाचा विचार मुंबई महानगर पालिका करीत आहे. त्यासाठी महापालिका मुख्यालयात येत्या 5 सप्टेंबरला महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे.
लालबागच्या राजासह, गणेश गल्लीतील मुंबईचा राजा चिंचपोकळी येथील चिंतामणी आदि मोठे गणपती चिंचपोकळी रेल्वे पूलावरून विसर्जनासाठी जातात. त्याशिवाय या भागातील सुमारे 50 हून जास्त गणपतीदेखील चिंचपोकळी व करी रोड पूलावरूनच गिरगाव चौपाटीकडे जातात. त्यामुळे होणारी गर्दी या पूलांसाठी धोकादायक ठरू शकते. म्हणूनच या पूलांवरून गणपती नेताना नाचू नका, असे सांगण्यात आले असले तरी अशा गर्दीवर मंडळांचेही नियंत्रण नसते, त्यामुळे या दोन पूलांव्यतिरिक्त पालिकेने अन्य पर्यायी मार्ग शोधण्यास सुरवात केली आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अवकाशात धाडलेले चंद्रयान 2 आज सकाळी चंद्राच्....
अधिक वाचा