ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आधारशी पॅन जोडण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२० पर्यंत

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 01, 2020 01:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आधारशी पॅन जोडण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२० पर्यंत

शहर : delhi

        आत्तापर्यंत ज्यांनी आधारकार्डशी पॅन लिंक केले नाही त्यांना दिलासा देण्यात आला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने पॅनला आधारशी जोडण्याची अंतिम मुदत वाढवून मार्च २०२० पर्यंत केली आहे. याअगोदर ही अंतिम मुदत मंगळवार (३१ डिसेंबर २०१९) पर्यंत होती. 


       प्राप्तिकर अधिनियम १९६१ च्या कलम १३९ (अ) (अ) च्या पोटकलम दोन अंतर्गत पॅनला आधारशी जोडण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१९ वरून वाढवून ३१ मार्च २०२० पर्यंत केली आहे, असे सीबीडीटीने म्हटले आहे. ही मुदतवाढ आठव्यांदा वाढवली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या आधार योजनेला घटनात्मकदृष्टय़ा कायदेशीर केले होते.

 

      प्राप्तिकर कायद्याच्या कलम १३९ एए (२) मध्ये म्हटले आहे की, प्रत्येक व्यक्तीकडे १ जुलै २०१७ रोजी पॅनकार्ड होते आणि जे आधार प्राप्त करण्यासाठी पात्र आहेत. त्यांना आपला आधार नंबर शुल्क अधिकाऱयांना देणे बंधनकारक आहे.
 

मागे

'चांद्रयान-३' च्या उड्डाणासाठी या वर्षीचा मुहूर्त; सरकारची मंजूरी 
'चांद्रयान-३' च्या उड्डाणासाठी या वर्षीचा मुहूर्त; सरकारची मंजूरी 

           इस्त्रोने पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हा....

अधिक वाचा

पुढे  

कोल्हापूकडे जाणारा तेलाचा टँकर मोटारीवर आदळला
कोल्हापूकडे जाणारा तेलाचा टँकर मोटारीवर आदळला

        सातारा - पुणे-बेंगळूर महामार्गावर तेलाचा टँकर उलटल्याची धक्कादा....

Read more