ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ’बाजीराव’चा मृत्यू

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 05:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ’बाजीराव’चा मृत्यू

शहर : मुंबई

बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पांढर्‍या वाघाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या वाघाचा वयोमानामुळे मृत्यू झाला आहे. पांढर्‍या वाघाचे नाव बाजीराव असे ठेवण्यात आले होते. त्याचा जन्म 2001 मध्ये रेणुका आणि सिद्धार्थ या वाघांच्या जोडीपासून झाला होता. बाजीरावचा मृत्यू 3 मे रोजी झाल्याचे उद्यानाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. संधीवात आणि स्नायुदुखीमुळे तो गेल्या 4 वर्षांपासून त्रस्त होता. गेल्या 10 दिवसांपासून त्याला चालताही येत नव्हते. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.  या वाघाची कातडी जतन करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हते. यामुळे शवविच्छेदनानंतर वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मागे

फानी चक्रीवादळाचा देशभरात फटका, पाच जणांचा मृत्यू
फानी चक्रीवादळाचा देशभरात फटका, पाच जणांचा मृत्यू

आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ओडिशाच्या किनार्‍यावर फानी चक्रीवादळ धडकल....

अधिक वाचा

पुढे  

हिंजवडी येथे किरकोळ भांडणानंतर कामगाराचा गळा दाबून खून
हिंजवडी येथे किरकोळ भांडणानंतर कामगाराचा गळा दाबून खून

हिंजवडी येथे किरकोळ भांडणानंतर एका कामगाराचा गळा दाबून खून केल्याची घटना &nb....

Read more