ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मंत्री शंकरराव गडाखांच्या वहिणी राहत्या घरात मृत आढळल्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 08, 2020 08:11 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मंत्री शंकरराव गडाखांच्या वहिणी राहत्या घरात मृत आढळल्या

शहर : अहमदनगर

राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी अहमदनगरमधील त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या आहेत. गौरी प्रशांत गडाख असं त्यांचं नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. अद्याप मृत्यूचं निश्चित कारण समजू शकलेलं नाही

गौरी गडाख यांचा दुपारीच मृत्यू झाला होता, मात्र सायंकाळी उशिरा ही माहिती सार्वजनिक झाली. या प्रकरणी पोलीस तपास करत आहे. गौरी गडाख यांना सायंकाळच्यावेळी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतरच मृत्यूच्या कारणाचा उलगडा होणार आहे, असी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी नगरच्या तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गडाख कुटुंबीय नगरच्या राजकारणातील मोठं नाव असल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे.

मागे

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये बदल
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये बदल

दिवाळी जवळ आली की, दरवर्षीच फटाक्यांच्या दु्ष्परिणामांची चर्चा होते. फटाक्....

अधिक वाचा

पुढे  

'वृत्तपत्र स्वातंत्र्याचे गटार राजकारण्यांनीच केले!' - खासदार संजय राऊत
'वृत्तपत्र स्वातंत्र्याचे गटार राजकारण्यांनीच केले!' - खासदार संजय राऊत

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर ह....

Read more