By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 20, 2020 05:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
जगभरात हैराण करुन सोडणार्या कोरोना विषाणूचा प्रभाव प्राण्यांवरही बघायला मिळत आहे. करोना व्हायरसचा आता पाळीव कुत्र्यांमध्येही शिरकाव झालाय. या व्हायरसने कुत्र्याचा मृत्यू झाल्याची पहिली घटना समोर आली आहे.
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार हाँगकाँगमध्ये करोनाग्रस्त 17 वर्षाच्या पाळीव कुत्र्याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या श्वानाला त्याच्या मालकिणीकडून करोनाची लागण झाली होती अशी माहिती आहे. पॉमेरियन जातीच्या कुत्र्याला करोनाच्या संशयावरुन आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले होते. 14 दिवस आयसोलेशनमध्ये ठेवल्यानंतर त्याला काही दिवसांपूर्वी सोडून देण्यात आले. पण, सूटका झाल्यानंतर दोनच दिवसांमध्ये त्या कुत्र्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आता अजून दोन श्वानांना हाँगकाँगमध्ये करोनाची लागण झाल्याची माहिती आहे.symbolic picture
कोरोना व्हायरसमुळे देशातील अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होत आहे. देशातील अर....
अधिक वाचा