ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

4 कोटींची शिष्यवृत्ती, अमेरिकेत शिक्षण, भारतात छेडछाड, बुलेटस्वारांच्या पाठलागात तरुणीचा मृत्यू

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 11, 2020 12:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

4 कोटींची शिष्यवृत्ती, अमेरिकेत शिक्षण, भारतात छेडछाड, बुलेटस्वारांच्या पाठलागात तरुणीचा मृत्यू

शहर : देश

अमेरिकेत उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात बुलेटस्वारांकडून झालेल्या छेडछाड आणि पाठलागात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदीक्षा भाटी असं या तरुणीचं नाव आहे. तिला तिच्या उच्च शिक्षणासाठी एचसीएलकडून तब्बल 3.80 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली होती. ती नुकतीच काही दिवस सुट्टीवर आली असताना तिचा अपघातात मृत्यू झाला. काही बुलेटस्वारांनी सुदीक्षाचा पाठलाग केल्यानंतर हा अपघात झाला.

सुदीक्षा अमेरिकेतील बॉब्सन येथे शिक्षण घेत होती. यासाठी तिला 3.80 कोटी रुपयांची विशेष स्कॉलरशीपही मिळाली. नुकतीच ती काही दिवस सुट्टीसाठी भारतात आली होती. त्याच दरम्यान ती आपल्या काकांसोबत औरंगाबादला मामांच्या घरी जात होती. त्यावेळी काही बुलेटस्वारांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. याच दरम्यानच्या गोंधळात सुदीक्षाच्या गाडीचा अपघात झाला. यात तिचा जागीच मृत्यू झाला.

सुदीक्षा गौतमबुद्ध नगरमधील दादरी येथे राहत होती. ती अत्यंत गरीब कुटुंबातून पुढे आली. ती शैक्षणिकदृष्ट्या अतिशय हुशार मुलगी होती. तिला पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील बॉब्सन येथे स्कॉलरशिपही मिळाली. नुकतीच ती काही दिवसांच्या सुट्टीसाठी घरी आली होती. ती आपल्या काकांसोबत औरंगाबादला मामांच्या घरी जात होती. त्याचवेळी हा अपघात झाला. त्यात सुदीक्षाचा मृत्यू झाला. तिचे वडील ढाबा चालवतात.

सुदीक्षाचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच झालं. त्यानंतर विशेष प्रवेश परीक्षेतून तिला एचसीएलच्या मालिक शिव नदार (सिकंदराबाद) शाळेत प्रवेश मिळाला. सुदीक्षाने 12 वीमध्ये जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तिची निवड अमेरिकेतील एका कॉलेजमध्ये झाली. पुढील शिक्षणासाठी सुदीक्षाला एचसीएलकडून 3.80 कोटी रुपयांची स्कॉलरशिपही मिळाली होती.

सुदीक्षा भाटीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे, “आम्ही बाईकवरुन औरंगाबादला जात होतो. त्यावेळी आमच्या गाडीचा बुलेटवर असलेल्या दोन युवकांनी पाठलाग गेला. ते कधी आपली बुलेट पुढे न्यायचे तर कधी सुदीक्षावर शेरेबाजी करायचे. इतकंच नाही तर ते बुलेटचे स्टंटही करत होते. हेच करत असताना त्या बुलेटस्वारांनी आमच्या गाडीच्या समोर येऊन अचानक बुलेटचा ब्रेक दाबला. त्यामुळे आमच्या बाईकची बुलेटला धडक बसली.” यात सुदीक्षा गंभीर जखमी झाली. तिचा जागेवरच मृत्यू झाला.

20 ऑगस्टला अमेरिकेला परतण्याचं नियोजन

सुदीक्षाला 20 ऑगस्टला अमेरिकेला परत जायचं होतं. याआधीच तिचा रस्ता दुर्घटनेत मृत्यू झाला. या घटनेने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या कुटुंबाने दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

मागे

घराचं वीज बिल 40 हजार, MSEB च्या फेऱ्या मारुनही कपात नाही, जाळून घेत आत्महत्या
घराचं वीज बिल 40 हजार, MSEB च्या फेऱ्या मारुनही कपात नाही, जाळून घेत आत्महत्या

लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्ष वीज मीटर रिडिंग न घेता अंदाजे काढण्यात आलेल्य....

अधिक वाचा

पुढे  

रेल्वे सेवा 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार? व्हायरल बातमीवर रेल्वे मंत्रालय म्हणाले...
रेल्वे सेवा 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार? व्हायरल बातमीवर रेल्वे मंत्रालय म्हणाले...

30 सप्टेंबरपर्यंत एकही लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या धावणार नाहीत, अशी एक बातमी....

Read more