By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 25, 2019 07:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
लहान भावासोबत शेजारच्या इमारतीत खेळत असलेल्या चंचल या 4 वर्षीय चिमुकलीने जमा असलेला कचरा जाळला, त्यात तिच्या फ्रॉकनेही आग पकडली. आग लागताच ती चिमुकली ओरडत खाली पळाली, तिचा आपाज ऐकून शेजारील महिलेने आग विझवली. त्यानंतर परिसरातील लोकांनी एम.वाय.एच हॉस्पीटलला घेऊन गेले, पण उपचारादरम्यान तिने प्राण सोडले. मुलीच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवर नीट उपचार न करण्याचा आरोप लावत हॉस्पीटलमध्ये गोंधळ केला.मुलीचे नातलग अनिल यांनी सांगितले की, दुपारी चंचल आपला लहान भाऊ आर्यन(3) सोबत खेळत होती. खेळता-खेळता ते दोघे शेजारी छगनलाल पाल यांच्या तिसऱ्या मजल्यावरील घरात गेले. तिथे कचरा पडला होता, चंचलने घरातील माचिस घेऊन कचरा जाळला.यावेळी तिच्या फ्रॉकनेही आग पकडली. आर्यन आणि चंचलने आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग वाढली म्हणून ती ओरडत खाली पळाली. तिचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या रीना जगदाले बाहेर आल्या आणि त्यांनी उशीच्या सहाय्याने आग विझवली. त्यानंतर चंचलची आई ज्योतीला माहिती सांगितली आणि तिला हॉस्पीटलमध्ये नेले.
पाणी पाजण्यास सांगितले होते
कुटुबीयांनी आरोप लावला आहे की, जेव्हा मुलीला हॉस्पीटलमध्ये दाखल केले, तेव्हा कोणत्या डॉक्टरांनी तिच्यावर ठीक उपचार केले नाही. तिच्या अंगावर एक क्रिम लावून झोपवले. रात्री एका डॉक्टरांनी तिला काहीतरी खाऊ घालण्यास सांगितले. त्यानंतर जेव्हा आम्ही तिला पाणी पाजले, तेव्हा तिने जीव सोडला. जर डॉक्टरांनी तिच्यावर नीट उपचार केले असते तर तिचा जीव वाचला असता. या प्रकरणावर डॉक्टर म्हणाले की, मुलगी खूप जळाली होती. आम्ही आमच्यापरीने खूप प्रयत्न केले पण मुलगी रिकव्हर नाही करू शकली.
धारावी शेषवाडी येथे राहत्या घराचा भाग कोसळला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ मा....
अधिक वाचा