ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरुच,कोरोनाच्या बळींची संख्या १६०० च्या वर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 16, 2020 01:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरुच,कोरोनाच्या बळींची संख्या १६०० च्या वर

शहर : विदेश

चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा आता दीड हजारापलिकेडे गेला आहे. हुबे प्रांतात आणखी १३९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला, तर हजार ४२० नवे रुग्ण आढळून आले. ६६ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या हुबे प्रांतात सर्वात जास्त आहे.

चीनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. आतापर्यंत १६३१ लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी चीनमध्ये १४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हुबेई प्रांतांत २४२० नवे रुग्ण आढळले आहेत.

चीनमध्ये हुबेई प्रांतात ५४ हजाराहून अधिक लोकं या व्हायरसच्या संपर्कात आले आहेत. तर संपूर्ण चीनमध्ये ६७ हजाराहून अधिक लोकांमध्ये कोरोनाचे लक्षणं आढळून आली आहेत.

चीनच्या बाहेर ५८० लोकांना याची लागण झाली आहे. तर चीन सोडून इतर देशांमध्ये या व्हायरसमुळे जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये फिलीपींस, हाँगकाँग आणि जपानचा समावेश आहे.

वुहानमध्ये तयार करण्यात आलेल्या विशेष रुग्णालयात हजार रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे.

Recommended Articles

मागे

...तर पॅन कार्ड रद्द होणार,आयकर विभागाचा इशारा
...तर पॅन कार्ड रद्द होणार,आयकर विभागाचा इशारा

देशातील 17 कोटी नागरिकांनी अद्यापही आपलं पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केले�....

अधिक वाचा

पुढे  

कोरोना व्हायरस मागे दडलेलं रहस्य
कोरोना व्हायरस मागे दडलेलं रहस्य

संपूर्ण देशभरात सध्या कोरोनाचा हाहाकार माजला आहे. या धोकादायक व्हायरसमुळे ....

Read more