ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू ; आकडा वाढण्याची भीती

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 23, 2019 07:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू ; आकडा वाढण्याची भीती

शहर : जळगाव

           जळगाव - एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा या गावानजीकच्या महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. आज दुपारी साधारण साडेचार वाजेच्यासुमारास खासगी वाहन व ट्रक यांच्यात हा भीषण अपघात झाला.


            एरंडोलकडून जळगावकडे किमान दहा ते बारा प्रवासी घेऊन जाणाऱ्या जीपला, विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला. या ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून ट्रक थेट समोरून येणाऱ्या जीपला धडकला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे घडलेल्या भीषण अपघातात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर जखमींना तातडीने एरंडोलच्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र दुर्देवाने रुग्णालयात उपचारादरम्यान आणखी तीन जणांचा मृत्यू झाला.


        रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय मृतांचा आकडा वाढण्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे.
 

मागे

थुंकीने फोन अनलॉक करण्याचे चॅलेंज झालं व्हायरल
थुंकीने फोन अनलॉक करण्याचे चॅलेंज झालं व्हायरल

          सोशल मिडियावर रोज काही ना काही नवीन घडत असतं. भारतामध्येही हे व....

अधिक वाचा

पुढे  

दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या दुर्दैवी मृत्यू, डॉक्टरला मारहाण
दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या दुर्दैवी मृत्यू, डॉक्टरला मारहाण

          मुंबई - कल्याणमध्ये दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या दुर्दैव....

Read more