By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 29, 2019 03:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सोलापूर
राज्यात सध्या तापमानमध्ये खूप वाढ झाली आहे. या वाढीमुळे राज्यात अनेक जण उष्माघातेचे बळी पडले आहेत. सोलापूर शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून जुळे सोलापूर परिसरात असलेल्या म्हाडा कॉलनीमधील सहवास नगरामधील एका महिलेचा या उन्हाच्या कडाक्याने बळी गेला आहे. कस्तुरा पवार (65) असे या मृत महिलेचे नाव आहे. रविवारी दुपारच्या सुमारास कडक उन्हामुळे कस्तुरा पवार यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना शहरातील खासगी रूग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले होते़ मात्र अधिकचा त्रास झाल्याने सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. सोलापूर शहरात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा 43 अंशांच्या पुढे गेल्यामुळे नागरिकांना दुपारच्यावेळी घराबाहेर पडणे देखील कठीण होत आहे. परिणामी जिल्ह्यातील रस्त्यांवर दुपार दरम्यान शुकशुकाट दिसून येतो. गेल्या वर्षीपेक्षा यंदा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात 43़4 अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले आहे़ या वाढलेल्या तापमानाचा फटका जनजीवनावर होतांना दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 17 मतदारसंघात दुपारी 1 वाजेप....
अधिक वाचा