ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सरसकट महिलांना लोकल प्रवासाची मुभा कधी ?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 19, 2020 01:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सरसकट महिलांना लोकल प्रवासाची मुभा कधी ?

शहर : मुंबई

मागील दोन दिवसांमध्ये जवळपास सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर मेट्रो आणि मोनो रेल अशा दोन्ही सार्वजनिक प्रवासाच्या सुविधा मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाल्या. त्यानंतर आता धीम्या गतीनं रुळावर येणाऱ्या मुंबईच्या लोकल सेवेला गती कधी मिळणार हाच प्रश्न उपस्थित होत आहे. यातच आता अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

सरसकट महिलांसाठी लोकल सेवा सुरू होण्या संदर्भातील निर्णय येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी १७ ऑक्टोबरपासून सर्व महिलांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत राज्य सरकारने रेल्वेला पत्र लिहलं होतं.

रेल्वे बोर्डाकडून परवानगी आणि प्रवाशी संख्या किती राहील या बाबत चर्चा करून निर्णय घेऊ याबाबत पश्चिम रेल्वेने आपत्ती व्यवस्थापन सचिव किशोरराजे निंबाळकर यांना पत्र पाठवलं होतं. त्याचसंदर्भात सोमवारी रेल्वे आणि राज्य सरकारच्या अधिकार्‍यांची चर्चा होऊन महिलांसाठी लोकल सुरू होण्याचा निर्णय येत्या दोन दिवसांत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, सरसकट सर्व महिलांसाठी रेल्वे सेवा सुरु करण्याच्या निर्णयामध्ये दिरंगाई होत असल्यामुळं महिला वर्गात नाराजी पाहायला मिळत आहे. रेल्वे प्रवासासाठी मोर्चे काढू तसेच रस्त्यावर उतरु, असा इशारा महिला प्रवाशांनी दिला आहे. बस आणि रिक्षाने प्रवासात अधिक पैसे मोजावे लागतात असं सांगत केंद्रानंही आता लवकरात लवकर सर्वसामान्य महिलांसाठी रेल्वे प्रवास सुरु करावा, अशी मागणीही जोर धरु लागली आहे.

मागे

TRP Scam | रिप्लबिक चॅनलच्या याचिकेवर सुनावणी, हरीश साळवे आणि कपिल सिब्बल आमने-सामने
TRP Scam | रिप्लबिक चॅनलच्या याचिकेवर सुनावणी, हरीश साळवे आणि कपिल सिब्बल आमने-सामने

‘टीआरपी घोटाळा’ (Fake TRP scam) प्रकरणी रिपब्लिक चॅनेलच्या (Republic) याचिकेवर सुनावणी....

अधिक वाचा

पुढे  

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पुन्हा पावसाचा इशारा
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पुन्हा पावसाचा इशारा

मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांना झोडपून काढणारा Rain पाऊस पुन्ह....

Read more