By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2020 10:20 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : ठाणे
कोरोना विषाणूचा फैलाव सुरुच आहे. मीरा,भाईंदर,वसई, पालघर येथेही कोविड-१९चा प्रादुर्भाव होत आहे. मात्र, येथील जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कोरोना लॅब उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे येथील जनतेची सोय होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मीरा भाईंदर येथील भक्ती वेदांत रुग्णालयाच्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेचे (Molecular Lab) राजभवन येथून डिजिटल माध्यमातून लोकार्पण केले.
जनसामान्यांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देत असल्याबद्दल भक्ती वेदांत रुग्णालयाचे अभिनंदन करताना रुग्णालयाने रुग्णांना मातृवात्सल्याने सेवा द्यावी तसेच उत्तम रुग्णसेवेचे उदाहरण समाजापुढे ठेवावे, असे आवाहन राज्यपालांनी केले. भक्ती वेदांत रुग्णालय नेहमीच निस्वार्थ रुग्णसेवेला प्राधान्य देत असल्याचे रुग्णालयाचे अध्यक्ष उद्योगपती हृषिकेश मफतलाल यांनी यावेळी सांगितले.
नव्या कोरोना तपासणी लॅब मुळे मीरा, भाईंदर, वसई आणि पालघर येथील जनतेची व रुग्णांची उत्तम सोय होईल, असे भक्ती वेदांत रुग्णालयाचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय संखे यांनी सांगितले. लोकार्पण सोहळ्याला मीरा भाईंदरच्या महापौर ज्योत्सना हसनाळे, आमदार गीता जैन यांसह भक्तीवेदांतचे डॉक्टर्स, कर्मचारी, स्वयंसेवक डिजिटल माध्यमातून उपस्थित होते.
राज्य सरकारने राज्यातील सर्व मॉल 5 ऑगस्टपासून सुरु करण्यास परवानगी दिली आह....
अधिक वाचा