By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 30, 2019 06:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
गुरुवारी २२,८०० करोड रुपयांच्या नव्या संरक्षण कराराला केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळालाय. यामध्ये नौसेनेसाठी एन्टी सबमरीन आणि शत्रूवर नजर ठेवणारे P8I एअरक्राफ्ट याशिवाय कोस्ट गार्डसाठी दोन इंजिन असणारं हेलिकॉफ्टर तसंच असाल्ट रायफल्ससाठी स्वदेशी नाईट व्हिजन डिवाईस यांचा समावेश आहे. नौसेनेनं अमेरिकेसोबत एकूण १२ P8I एअरक्राफ्टचा करार केला होता. यातील ८ एअरक्राफ्ट नौसेनेत दाखल झालेत तर आणखीन ४ लवकरच नौसेनेत दाखल होऊ शकतात.
P8I - हवेतून समुद्राच्या तळाशी हल्ला
उल्लेखनीय म्हणजे, नौसेनेनं १० एअरक्राफ्टची मागणी केली होती. परंतु, केंद्र सरकारकडून नव्या सहा P8I एअरक्राफ्टच्या खरेदीसाठी मंजुरी मिळालीय. हे एअरक्राफ्ट समुद्राच्या वर दूरपर्यंत टेहळणी आणि देखरेख करू शकतात. या एअरक्राफ्टचे शक्तीशाली रडार समुद्रातील एखादी छोटी होडीही सहज नजरेत आणू शकतात. तसंच त्याचे फोटोही घेऊ शकतात. या एअरक्राफ्टच्या सहाय्यानं सबमरीन किंवा लढाऊ जहाजांवरही हल्ला केला जाऊ शकतो. 'एन्टी सबमरीन' आणि 'एन्टी सरफेस' हल्ल्यासाठी या एअरक्राफ्टचा उपयोग शक्य आहे. अर्थात, हवेत उडतानाच खोल समुद्रातील शत्रुच्या पानबुडीवर तसंच समुद्राच्या पाण्यावर तरंगणाऱ्या जहाजांवर हल्ला करण्यासाठी यांचा वापर केला जाऊ शकतो.
रात्रीच्या अंधारात शत्रूला धुंडाळून काढण्यासाठी उपकरणं
मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर समुद्र तटांच्या सुरक्षेसाठी नव्या उपकरणांची खरेदी वाढवण्यात आलीय. यासाठी भारतीय सुरक्षा दलाला रात्रीच्या काळोखात कारवाई करताना अडचणींना तोंड द्यावं लागू नये, यासाठी स्वदेशी 'थर्माल इमेजिंग नाईट साइटस' बनवण्यात येणार आहे. ही उपकरणं भारतातच तयार होतील... आणि सीमेवर तैनात सैनिकांच्या गरजेनुसार त्यांची निर्मिती केली जाणार आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या आं....
अधिक वाचा