ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

डिफेन्स एक्स्पोला सुरुवात: ७० देशांचा समावेश

By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 05, 2020 12:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

डिफेन्स एक्स्पोला सुरुवात: ७० देशांचा समावेश

शहर : lucknow

        लखनऊ : भारताच्या उत्तर प्रदेशातील लखनऊ भागात सर्वात मोठे संरक्षणविषयक शस्त्रास्त्र प्रदर्शन आज ५ फेब्रुवारीला सुरू झाले आहे. या प्रदर्शनास ७० देश सहभागी होणार अशी माहिती मिळाली आहे, तसेच चीन आणि पाकिस्तान या दोन देशांना वगळण्यात आले आहे. 

           पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. तसेच अन्य २५ देशांचे पंतप्रधान या प्रदर्शनाला उपस्थित राहणार आहेत. १६५ शस्त्रास्त्र कंपन्या देखील आपले सादरीकरण करणार असून, यामध्ये नौदल दल, हवाई दल आणि पायदलचा सरावही पहायला मिळणार आहे. या प्रदर्शनाची संकल्पना भारताच्या संरक्षणातील 'उदयोन्मुख हब’ अशी आहे.  

      अमेरिकेतील एअरोस्पेस कंपनी लॉकहीड मार्टीनचे आधुनिक एफ-३५ लढाऊ जेट, युरोपीयन कंपनी एअरबस सी-२९५ विमान पहायला मिळणार. तसेच भारताचे तेजस, एअरबोर्न अर्ली वॉर्निंग ऍन्ड कन्ट्रोल सिस्टिम, मानवरहित ड्रोन रुस्तुमसह ऍडव्हान्स्ड पायलटलेस हेवी ड्रॉप सिस्टिम, निर्भय हे क्षेपणास्त्र देखील प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. २० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची या प्रदर्शनातून अपेक्षा वर्तवली जात आहे. 
 

मागे

उल्लासनगरात सात जणांना विषबाधा
उल्लासनगरात सात जणांना विषबाधा

       उल्हासनगर  : अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा येथे माघी गणेशोत्सव....

अधिक वाचा

पुढे  

मराठा आरक्षण प्रकरणी महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा
मराठा आरक्षण प्रकरणी महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा

        नवी दिल्ली - मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सर....

Read more