By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 31, 2021 08:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
दिल्लीत इस्त्रायली दुतावासाजवळ झालेल्या स्फोटाचे धागे दोरे शोधण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA आणि दिल्ली पोलीसांची स्पेशल टीम कामाला लागलीय. घटनास्थळावरुन वेगवेगळं साहित्य जप्त करण्यात आलंय. त्यात एक गुलाबी रंगाचा दुपट्टा आहे जो अर्धवट जळालेल्या अवस्थेत आहे. त्याचा ह्या स्फोटाशी काही संबंध आहे का याचा शोध तपास यंत्रणा करतायत. दरम्यान ह्या स्फोटाची जबाबदारी जैश ए उल हिंद या दहशतवादी संघटनेनं घेतलीय.
सीसीटीव्हीच बंद?
स्फोटचा तपास करण्यासाठी अब्दूल कलाम रोडवरचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आलंय. पण पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार परिसरातले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे हे कामच करत नव्हते. ते बंद आहेत. जे कॅमेरे सुरु आहेत त्यातलं गेल्या तीन दिवसातलं फुटेज ताब्यात घेण्यात आलं आहे. सीसीटीव्ही बंद असल्यामुळे तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढणार आहे.
पिक अप, ड्रॉप गाड्यांचीही चौकशी इस्त्रायली दुतावासाजवळ येण्यासाठी ज्या भागातून कॅब प्रवाशांना पिक अप करतात आणि ड्रॉप करतात तिथल्या सगळ्या कॅबची चौकशी केली जातेय. त्यासाठी ओला उबेरशीही पोलीसांनी संपर्क केल्याची माहिती समोर येतेय. किती जणांना नेमक्या त्याच ठिकाणी ड्रॉप केलं किंवा पिक अप केलं तेही तपासलं जातंय.
जैश उल हिंद काय आहे?
दरम्यान ह्या स्फोटाची जबाबदारी घेतलेल्या जैश उल हिंद या दहशतवादी संघटनेबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही पण तपास यंत्रणा माहिती गोळा करण्यात गुंतलेल्या आहेत. जैश ए उल हिंदनं स्फोटाची जबाबदारी घेत हा तर फक्त ट्रेलर असल्याची धमकी दिलीय.
बाल लैंगिक शोषणाबाबत दोन वादग्रस्त निकाल दिल्याने नागपूर खंडपीठाच्या न्य....
अधिक वाचा