ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दिल्लीच्या सीमेवर ट्रॅक्टर रॅली, हजारोंच्या संख्येने शेतकरी सामील होणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 26, 2021 08:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30

दिल्लीच्या सीमेवर ट्रॅक्टर रॅली, हजारोंच्या संख्येने शेतकरी सामील होणार

शहर : देश

केंद्र सरकारने लागून केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आज (26 जानेवारी) शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे (Farmers tractor march) आयोजन केले आहे. मागील कित्येक दिवसांपासून शेतकरी या रॅलीची तयारी करत आहेत. 72 व्या प्रजासत्ताकदिनी (Republic day) दिल्लीच्या सीमेवर होणाऱ्या या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने शेतकरी सामील होणार आहेत. तसेच, हजारो ट्रॅक्टरची रॅलीही यावेळी काढण्यात येणार आहे.

पोलिसांची नियमावली काय?

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी प्रजासत्ताकदिनीच ट्रॅक्टर रॅली काढणार असल्यामुळे दिल्लीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना रॅलीचा मार्ग निश्चित करुन देण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना काही गाईडलाईन्सही घालून दिलेल्या आहेत.

दिल्ली पोलिसांनी रॅलीमध्ये एकूण 5000 शेतकऱ्यांना सामील होण्यास परवानगी दिलेली आहे. तसेच, ट्रॅक्टर रॅलीमध्ये जास्तीत जास्त 5000 ट्रॅक्टरचा समावेश करता येईल, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. ही रॅली दुपारी 12 ते संध्याकाळी 5 या वेळेतच काढली जावी असेही दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांना सांगितले आहे. तसेच रॅलीदरम्यान संमतीविना लाऊडस्पीकरवर भाषण देण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.

दिल्लीमध्ये सुरक्षेत वाढ

ट्रॅक्टर रॅलीमध्ये सामील होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या, ट्रॅक्टर्सच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता या सर्व गोष्टी लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी आवश्यक त्या सर्व उपायोजना केल्या आहेत.पोलिसांनी दिल्ली शहर, तसेच दिल्लीच्या सीमेवर सुरक्षा वाढवलेली आहे. राजपथावर प्रजासत्ताक दिनाची परेड समाप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला सुरवात होईल.

लढा आणखी तीव्र करणार

दरम्यान, आजची ट्रॅक्टर रॅली झाल्यानंतर हे आंदोलन आणखी तीव्र केले जाणार असल्याचे येथील शेतकऱी नेत्यांनी सांगितले आहे. 1 फेब्रवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करताना, वेगवेगळ्या स्थानांवरुन दिल्लीतील संसदेवर मोर्चा काढला जाणार असल्याची शेतकऱ्यांनी घोषणा केली आहे.

मागे

Padma Award : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा, पाहा संपूर्ण यादी
Padma Award : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा, पाहा संपूर्ण यादी

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घ....

अधिक वाचा

पुढे  

Republic Day: राजपथावरील संचलनात महाराष्ट्राचा देखणा चित्ररथ
Republic Day: राजपथावरील संचलनात महाराष्ट्राचा देखणा चित्ररथ

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर होणाऱ्या संचलनात (rajpath parade 2021) स....

Read more