By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 03, 2019 05:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
दिल्ली हायकोर्ट ने नुकतेच पोलिसांच्या वागणुकी च्या वारंवार येणार्या तक्रारींवर उपाय म्हणून पोलीसांच्या खांद्याला कॅमेरे लावण्याबदल सुचविले आहे.
दिल्ली मध्ये घडलेल्या एका घटनेवरती निर्णय देताना कोर्टाने ही सूचना केली. एका टेम्पोचालकाच्या मुलाला आणि चालकाला पोलिसांनी केलेल्या मारहानी नंतर टेम्पोचालक पोलिसांवर तलवार घेऊन धावला होता. या प्रकारावरुन ही याचिका दाखल करण्यात आली होती मुख्य न्यायाधीश डी एन पटेल आणि सी हरीशंकर यांच्यासमोर ही सुनावणी झाली.
रस्त्यावर पोलिसांसोबत लोकांनी आणि लोकांसोबत पोलिस हुज्जत घालत असल्याचे चित्र कुठे ना कुठे दिसत असत. त्यामुळे पोलिसांनी अनेक वेळा गैरवर्तन केल्यामुळे लोकांना हुज्जत घालायची वेळ येते . अनेक वेळा असे खोटे आरोपही पोलिसांवर केले जातात .त्यामुळे खरे खोट काही कळत नाही. त्यामुळे पोलिसांचे वर्तन सुधारण्यासाठी ही सूचना कोर्टाने केली.
बॉडी वांर्ण कॅमेरा पोलिसाच्या खांद्याला किंवा डोकयाला अडकवून त्याद्व्यारे घटनेचे चित्रीकरण आणि आवाज टिपून माहिती मिळवता येते व माहिती सुरक्षित ठेवता येते.
आर्थिक अडचणीमुळे डबघाईस आलेल्या जेट एअरवेज ची सेवा ठप्प झालेली असतानाचा आत....
अधिक वाचा