ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Farmer Protest | दिल्लीतील आंदोलनातून परतलेल्या पंजाबच्या शेतकऱ्याची आत्महत्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 21, 2020 11:58 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Farmer Protest | दिल्लीतील आंदोलनातून परतलेल्या पंजाबच्या शेतकऱ्याची आत्महत्या

शहर : देश

मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आलेल्या एका शेतकऱ्याने पंजाबला गेल्यानंतर आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा शेतकरी 2 दिवसांपूर्वीच दिल्लीतील आंदोलनातून परत पंजाबला आपल्या घरी आला होता. मृत 22 वर्षीय शेतकऱ्याचं नाव गुरलाभ सिंग असं आहे. तो बठिंडा जिल्ह्यातील दयालपुरा मिर्जा या गावातील रहिवासी होता. तो 18 डिसेंबरला आंदोलनावरुन परतला होता

तरुण शेतकरी गुरलाभने शनिवारी (19 डिसेंबर) आपल्या घरी विषारी पदार्थ खाऊन आपली जीवनयात्रा संपवली. विष खाल्ल्यानंतर त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. गुरलाभवर 6 लाख रुपयांचं कर्ज असल्याचंही सांगितलं जातंय. असं असलं तरी त्याच्या आत्महत्येचं निश्चित कारण अद्याप समजलेलं नाही.

23 डिसेंबरला एक दिवस अन्नत्याग करण्याचं शेतकऱ्यांचं आवाहन

दरम्यान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह देशभरातील हजारो शेतकरी 26 नोव्हेंबरपासून राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. शेतकरी मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचा विरोध करत आहेत. हे कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहेत, असा आरोप शेतकरी आंदोलक करत आहेत. या शेतकरी आंदोलनाचा (Farmers Protest) आज (20 डिसेंबर) 25 वा दिवस आहे. सध्यातरी सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यास तयार नसल्याचं दिसत आहे. दुसरीकडे शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना आदरांजली देत आहेत.

भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत म्हणाले, “जोपर्यंत सरकार नवे कृषी कायदे मागे घेत नाही आणि किमान आधारभूत किमतीवर (MSP) कायदा होत नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलन मागे घेणार नाही. 23 डिसेंबरला शेतकरी दिवसाच्या निमित्ताने देशभरातील नागरिकांनी एकावेळी अन्नत्याग करुन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावा.”

गाजियाबादमध्ये शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचंही पाहायला मिळालं. हे शेतकरी मेरठवरुन दिल्लीकडे येत होते. अर्थला कटवर पोलिसांनी त्यांना अडवल्यानंतर झटापट झाली. यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला.

मागे

मुंबईला आतून बाहेरून बदलणारा कोस्टल प्रोजेक्ट कुठपर्यंत आलाय?
मुंबईला आतून बाहेरून बदलणारा कोस्टल प्रोजेक्ट कुठपर्यंत आलाय?

मुंबई महापालिकेने सर्वात मोठा प्रकल्प हाती घेतला आहे तो म्हणजे कोस्टल रोड ....

अधिक वाचा

पुढे  

Night Curfew: हॉटेल व्यावसायिकांनंतर व्यापारी आक्रमक, नाईट कर्फ्यूला विरोध
Night Curfew: हॉटेल व्यावसायिकांनंतर व्यापारी आक्रमक, नाईट कर्फ्यूला विरोध

यूकेमधील कोरोना विषाणूच्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाप....

Read more