By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 09, 2020 04:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
नवी दिल्ली – ‘आयएस’च्या तीन संशयित दहशतवाद्यांना आज सकाळी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तावडीत घेतले. वजीराबादच्या चकमकीनंतर तिन्ही दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जमा करण्यात आली असून त्यांची पोलीस चौकशी करत आहेत.
सध्या दिल्लीत ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. त्यातच प्रजासत्ताक दिनही जवळ आला आहे. त्यामुळे शहरात हाय अलर्ट जाहीर केला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं आयएसच्या तीन संशयित दहशतवाद्यांना आसामच्या गोपालपाडामधून पकडलं होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, हे संशयित रासमेलमध्ये होणाऱ्या स्थानिक यात्रेत भूसुरुंग स्फोट घडवणार होते. त्यानंतर दिल्ली हे त्यांचे लक्ष्य होते. दहशतवाद्यांबद्दल मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, विशेष पथकानं या तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून एक कम्प्लीट आयइडी, एक किलो स्फोटकं आणि दोन चाकू हस्तगत करण्यात आले आहेत.
मुंबई - बेस्ट उपक्रमाने काही रहदारीच्या मार्गांवर मिनी व मेडी ....
अधिक वाचा