By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 18, 2020 04:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
नवी दिल्ली : 'राष्ट्रपिता' महात्मा गांधींना भारतरत्न देण्याची मागणी करणारी जनहितात याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती, परंतु सर्वोच न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. देशातील लोकांनी महात्मा गांधीना 'राष्ट्रपिता'चा सन्मान दिला आहे. त्यामुळे महात्मा गांधींना भारतरत्न द्या, असे आदेश केंद्र सरकारला देणे हे योग्य नसल्याचे सर्वोच न्यायालयाने सांगितले आहे.
महात्मा गांधी यांना भारतरत्न पुरस्कारापेक्षा ही मोठी उपाधी दिली गेली आहे. जगभरात महात्मा गांधीजींची ख्याती पसरली आहे. महात्मा गांधीं लोकांना सांगायचे की, नेहमी खरे बोलावे. देशातील अनेक सुप्रसिद्ध दिग्गजांना भारतरत्न पुरस्कार देऊन केंद्र सरकारने त्यांचा गौरव केला आहे. महात्मा गांधींचाही व्हावा, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली होती.
श्रीनगर - जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० कें....
अधिक वाचा