ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मराठा आरक्षण स्थगिती उठविण्यासंदर्भात सुनावणी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 27, 2020 10:41 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मराठा आरक्षण स्थगिती उठविण्यासंदर्भात सुनावणी

शहर : देश

आरक्षणावर आलेली स्थगिती उठवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. यापूर्वी स्थगितीचा आदेश देणाऱ्या खंडपीठासमोरच सुनावणी आहे. त्यामुळे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

न्यायमूर्ती एल.एन.राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी सुनावणी घेणार. यात शैक्षिणक प्रवेश प्रक्रिया आणि नोकरी भरती प्रक्रियेतील मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवावी, अशी विनंती करण्यात आली आहे. तर गायकवाड कमिटीचा रिपोर्ट पाहता न्यायालयाने स्थगिती दिली. तर गायकवाड कमिटीचा अहवाल महाराष्ट्र सरकारचे वकील न्यायालयात वाचून दाखवणार आहे.

                                                             

यावर विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात मुद्दे मांडले आहेत. इंदिरा सहानी खटल्याचा आधार घेऊन मराठा आरक्षणावर स्थगिती दिली होती. मात्र तो खटला मागासवर्गीय आरक्षणाबाबत होता, तर मराठा आरक्षण हे सामाजिक आणि शैक्षणिक मागास हा नवा प्रवर्ग तयार करून देण्यात असल्याचा मुद्दा विनोद पाटील यांच्यातर्फे मांडण्यात येणार आहे.

 

मागे

मराठा आरक्षण : न्यायालयात बाजू मांडणाऱ्या वकिलांवर पूर्ण विश्वास - संभाजीराजे
मराठा आरक्षण : न्यायालयात बाजू मांडणाऱ्या वकिलांवर पूर्ण विश्वास - संभाजीराजे

मराठा समाजाची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या वकिलांवर पूर्ण विश्वास आहे, असे म....

अधिक वाचा

पुढे  

सलग दुसऱ्या दिवशी बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद, शेतकरी चिंताक्रांत
सलग दुसऱ्या दिवशी बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद, शेतकरी चिंताक्रांत

लासलगावसह जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज कांदा लिलाव बंद करण्....

Read more